पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे प्रगती मैदानावर “एकसंध भारत:सरदार पटेल ” या डिजिटल प्रदर्शनाचे उदघाटन केले .
पंतप्रधानांनी विविध राज्यांमधील लोकांमध्ये एकमेकांबद्दल जागरूकता वाढीस लागावी यासाठी विविधतेत एकता या भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी “एक भारत , श्रेष्ठ भारत “हा उपक्रम देखील सुरु केला. या उपक्रमांतर्गत , यावेळी प्रत्येकी दोन राज्यांमध्ये ६ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या देखील करण्यात आल्या.
यावेळी बोलताना , पंतप्रधानांनी सरदार पटेल यांनी देशाला दिलेल्या महान योगदानाबद्दल त्यांना आदरांजली वाहिली आणि म्हणाले कि अशा महान व्यक्तींचे कधीही विस्मरण होता कामा नये.
संघटनेत सहभागी होण्यासाठी संस्थानांचे मन वळवून देश अखंड राखण्यात सरदार पटेल यांनी बजावलेल्या भूमिकेची त्यांनी विस्तृत माहिती दिली.
“एक भारत , श्रेष्ठ भारत ” उपक्रमाच्या माध्यमातून देशातील विविध राज्यांच्या लोकांमध्ये संबंध कसे प्रस्थापित होऊ शकतील हे स्पष्ट करण्यासाठी पंतप्रधानांनी अनेक दाखले दिले.
B.Gokhale/S.Kane/Anagha
Flagged off the ‘Run for Unity.’ Role of Sardar Patel in unifying the nation is invaluable. pic.twitter.com/xlDAoHMYrs
— Narendra Modi (@narendramodi) October 31, 2016