Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांचे स्वागत केले


नवी दिल्ली, 24 जानेवारी 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरब प्रजासत्ताक इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांचे हार्दिक स्वागत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी 24-26 जानेवारी 2023 या कालावधीत भारताच्या दौऱ्यावर आहेत. भारताच्या दौऱ्यावर दुसऱ्यांदा आलेलेइजिप्तचे राष्ट्राध्यक्ष सिसी हे भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे असतील.

पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:

राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी, भारतात आपले स्वागत आहे. आमच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी मुख्य अतिथी म्हणून आपली ऐतिहासिक भारत भेट ही सर्व भारतीयांसाठी खूप आनंदाची बाब आहे. उद्याच्या आपल्या बरोबरच्या संवादाची वाट पाहत आहे @AlsisiOfficial”

 

 

S.Kane/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai