Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत इनोव्हेशन चॅलेंजचा केला प्रारंभ


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांकडून वापरल्या जाणारे आणि त्यांच्या संबंधित श्रेणीत जागतिक दर्जाचे ऍप्प बनण्याची संभाव्य क्षमता असलेले सर्वोत्कृष्ट भारतीय ऍप्स जाणून घेण्याच्या उद्देशाने आत्मनिर्भर भारत इनोव्हेशन चॅलेंज सुरू केले आहे.

“जागतिक दर्जाचे मेड इन इंडिया अँप्स तयार करण्यासाठी आज टेक आणि स्टार्ट अप समुदायामध्ये प्रचंड उत्साह आहे. त्यांच्या कल्पना आणि उत्पादने यांना वाव देण्यासाठी @GoI_MeitY आणि @AIMtoInnovate Aatmanirbhar आत्मनिर्भर भारत अ‍ॅप इनोव्हेशन चॅलेंज सुरू करत आहेत.

तुमच्याकडे असे कार्यशील उत्पादन असल्यास किंवा अशी उत्पादने तयार करण्यासाठी तुमच्याकडे दूरदृष्टी आणि अनुभव आहे असे तुम्हाला वाटत असल्यास हे आव्हान तुमच्यासाठी आहे. तंत्रज्ञान समुदायातील माझ्या सर्व मित्रांना मी सहभागी होण्याचे आवाहन करतो. “, असे पंतप्रधान म्हणाले.