Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी, लेपाक्षी इथल्या वीरभद्र मंदिरात दर्शन घेत केली पूजा

पंतप्रधानांनी आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी, लेपाक्षी इथल्या वीरभद्र मंदिरात दर्शन घेत केली पूजा


नवी दिल्ली , 16 जानेवारी 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी जवळच्या लेपाक्षी इथल्या वीरभद्र मंदिरात दर्शन आणि पूजा केली. मोदी यांनी तेलगू भाषेतील, रंगनाथ रामायणातील कवने ऐकली आणि आंध्र प्रदेशातील थोलू बोम्मालता या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पारंपरिक छाया कठपुतळी कला प्रकाराअंतर्गत, सादर केलेली जटायूची कथाही पाहिली.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे:

प्रभू श्रीरामाचे भक्त असलेल्या सर्वांसाठी लेपाक्षीचे मंदिर अत्यंत महत्वाचे ठरते. आज मला वीरभद्र मंदिरात प्रार्थना करण्याचा सन्मान मिळाला. भारतातील सर्व लोक आनंदी, निरोगी आणि समृद्धीची नवीन उंची गाठतील,अशी प्रार्थना केली.

लेपाक्षी इथल्या वीरभद्र मंदिरात, रंगनाथ रामायणातील कवने श्रवण केली आणि रामायणावर आधारित, कठपुतळी कार्यक्रमाचाही आनंद घेतला.

 

 

 

S.Kane/R.Aghor/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai