Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी अर्जेंटिनाच्या अध्यक्षांची घेतली भेट

पंतप्रधानांनी अर्जेंटिनाच्या अध्यक्षांची घेतली भेट


नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे जी 20 शिखर परिषदेच्या निमित्ताने 19 नोव्हेंबर रोजी अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मिलेई,यांची भेट घेतली.

दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच द्विपक्षीय बैठक होती.अध्यक्ष मिलेई यांनी पंतप्रधानांच्या ऐतिहासिक तिसऱ्या कार्यकाळासाठी त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधानांनी अध्यक्ष मिलेई यांना पदभार स्वीकारल्याबद्दल हार्दिक शुभेच्छाही दिल्या.

उभय  नेत्यांनी प्रशासनाच्या विषयावर सविस्तर चर्चा केली तसेच  या क्षेत्रातील आपापले अनुभव देखील सामायिक केले.गेल्या काही वर्षांमध्ये या दोन्ही ऊर्जाशील लोकशाहींदरम्यान धोरणात्मक भागीदारी अधिक व्यापक झाल्याबद्दल  त्यांनी समाधान व्यक्त केले.उभय देशांमधील वाढते व्यापार आणि आर्थिक संबंध उल्लेखनीय असून भारत अर्जेंटिनाच्या आघाडीच्या  पाच व्यापारी भागीदारांपैकी एक म्हणून उदयाला आला आहे .

उभय देशांमधील द्विपक्षीय सहकार्य देखील वैविध्यपूर्ण असून त्यात औषध निर्मिती, संरक्षण , लिथियम सह महत्वपूर्ण खनिजे , तेल आणि वायू, नागरी अणुऊर्जा, अंतराळ, कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान यांचा समावेश आहे.अर्जेंटिनाने सध्या हाती घेतलेल्या आर्थिक सुधारणांवरही उभय नेत्यांनी आपली मते मांडली.

दोन्ही नेत्यांनी सध्याच्या अनेक आंतरराष्ट्रीय समस्यांवर  चर्चा केली आणि दोन्ही देशांच्या लोकांच्या परस्पर हितासाठी  धोरणात्मक भागीदारी आणखी विकसित करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याबाबत सहमती दर्शवली

 

 

S.Patil/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai