Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी, अमेरिकेच्या प्रथम महिला यांच्यासह “भारत आणि अमेरिका: भविष्यासाठी कौशल्य विकास” या कार्यक्रमात घेतला भाग

पंतप्रधानांनी, अमेरिकेच्या प्रथम महिला यांच्यासह “भारत आणि अमेरिका: भविष्यासाठी कौशल्य विकास” या कार्यक्रमात घेतला भाग


नवी दिल्‍ली, 22 जून 2023

वॉशिंग्टन डीसी येथील राष्ट्रीय विज्ञान केन्द्र येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या प्रथम महिला डॉ. जिल बायडेन यांनी “भारत आणि अमेरिका: भविष्यासाठी कौशल्य विकास” या विषयावरील कार्यक्रमात भाग घेतला.

समाजात दर्जेदार शिक्षणाचा विस्तार आणि संधी वाढवण्यासाठी उच्च शिक्षण संस्थांमधील मनुष्यबळाच्या पुनर्विकासावर हा कार्यक्रम केंद्रित होता.

भारताने शिक्षण, कौशल्य आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उचललेल्या पावलांवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. सुरू असलेल्या द्विपक्षीय शैक्षणिक देवाणघेवाण आणि भारतीय तसेच अमेरिकी शैक्षणिक आणि संशोधन परिसंस्था यांच्यातील सहकार्याचे त्यांनी कौतुक केले. शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात भारत-अमेरिका सहकार्याला ऊर्जा देण्यासाठी 5 कलमी प्रस्ताव पंतप्रधानांनी सादर केला, तो पुढीलप्रमाणे:

  • सरकार, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्राला एकत्र आणणारा एकात्मिक दृष्टीकोन
  • शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन
  • दोन्ही देशांदरम्यान विविध विषयांवर हॅकेथॉनचे आयोजन
  • व्यावसायिक कौशल्यांच्या पात्रतेची परस्पर ओळख
  • शिक्षण आणि संशोधनाशी संबंधित लोकांच्या भेटींना प्रोत्साहन.

या कार्यक्रमाला नॉर्दर्न व्हर्जिनिया कम्युनिटी कॉलेजचे अध्यक्ष, असोसिएशन ऑफ अमेरिकन युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष, मायक्रॉन टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष आणि सीईओ तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

* * *

S.Tupe/V.Ghode/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai