पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले.
75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर या परिषदेचे महत्त्व विशद करताना पंतप्रधान म्हणाले, “आपल्या राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण होत असताना 75 व्या प्रजासत्ताक दिनानंतर लगेचच ही परिषद होत असल्याने या परिषदेला अधिक महत्त्व आहे.” यावेळी पंतप्रधानांनी संविधान सभेच्या सदस्यांना अभिवादन केले.
संविधान सभेतून शिकण्याचे महत्त्व अधोरेखित करत पंतप्रधान मोदी म्हणाले की आपल्या संविधान सभेतून शिकण्यासारखे बरेच काही आहे. विविध विचार, विषय आणि मतांमधून सर्वसहमती निर्माण करण्याची जबाबदारी संविधान सभेच्या सदस्यांवर होती आणि त्यांनी ती योग्य रीतीने पार पाडली. उपस्थित पीठासीन अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी त्यांना संविधान सभेच्या आदर्शांपासून पुन्हा एकदा प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. “तुमच्या कार्यकाळात असे काम करून दाखवा जे भावी पिढ्यांसाठी अनमोल ठेवा ठरू शकेल”, असे त्यांनी आग्रहपूर्वक सांगितले.
विधिमंडळाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या गरजेबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले, “विधिमंडळे आणि समित्यांची कार्यक्षमता वाढवणे हे आजच्या परिस्थितीत अत्यंत महत्वाचे आहे, जिथे जागरूक नागरिक प्रत्येक प्रतिनिधीची पारख करून निवड करतात.”
विधिमंडळात सभ्य वर्तन राखण्याच्या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “सभागृहातील सदस्यांचे वर्तन आणि तेथील अनुकूल वातावरण याचा विधिमंडळाच्या उत्पादकतेवर थेट प्रभाव पडतो. या परिषदेतून मिळणाऱ्या ठोस सूचना उत्पादकता वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील.” लोकप्रतिनिधींचे सभागृहातील वर्तन, सभागृहाची प्रतिमा ठरवते, असे ते म्हणाले. काही पक्ष त्यांच्या सदस्यांच्या आक्षेपार्ह वर्तनाबद्दल त्यांना समज देण्याऐवजी त्यांचे समर्थन करतात, याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. “संसदेसाठी किंवा विधिमंडळांसाठी ही स्थिती चांगली नाही ” असे ते म्हणाले.
Sharing my remarks at the All India Presiding Officers’ Conference. https://t.co/SuTZ7xV7PB
— Narendra Modi (@narendramodi) January 27, 2024
***
M.Pange/S.Kane/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Sharing my remarks at the All India Presiding Officers’ Conference. https://t.co/SuTZ7xV7PB
— Narendra Modi (@narendramodi) January 27, 2024