Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी,सॉफ्टबँक कॉर्पोरेशनचे संस्थापक मासायोशी सोन यांची घेतली भेट

पंतप्रधानांनी,सॉफ्टबँक कॉर्पोरेशनचे संस्थापक मासायोशी सोन यांची घेतली भेट


नवी दिल्ली, 23 मे 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 मे 2022 रोजी सॉफ्टबँक कॉर्पोरेशनचे संचालक मंडळावरचे संचालक आणि संस्थापक मासायोशी सोन यांची टोकियो  येथे भेट घेतली. भारताच्या स्टार्टअप क्षेत्रांतील सॉफ्टबँकच्या भूमिकेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.तसेच त्यांनी तंत्रज्ञान, ऊर्जा आणि वित्त यासारख्या भारतातील महत्त्वाच्या क्षेत्रांमधील सॉफ्टबँकच्या भविष्यातील सहभागावर यावेळी चर्चा केली.

भारतात व्यवसाय सुलभतेसाठी(ईझ ऑफ डुईंग बिझनेस) होत असलेल्या विविध सुधारणांवर त्यांनी चर्चा केली. भारतात  सॉफ्टबँकेची गुंतवणूक वाढवता येईल असे विशिष्ट प्रस्ताव या भेटीत सामायिक करण्यात आले.  

NC/SP/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com