Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांना ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी दूरध्वनीवरून दिल्या शुभेच्छा


नवी दिल्‍ली, 6 जून 2024

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बेनीज यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यांच्याशी दूरध्वनीवरुन शुभेच्छा दिल्या . त्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे आभार मानले.

या संभाषणादरम्यान मोदी यांनी त्यांच्या 2023 मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्याची तसेच गेल्या सप्टेंबर महिन्यात दिल्ली येथे जी-20 परिषदेच्या अनुषंगाने पंतप्रधान अल्बेनीज यांच्यासोबत झालेल्या बैठकीची आठवण काढली.

व्यापक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी तसेच हिंद-प्रशांत क्षेत्रात सामायिक प्राधान्यक्रमाच्या घटकांबाबत एकमेकांबरोबर  काम करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत एकत्र येऊन प्रयत्न करण्याच्या वचनबद्धतेचा पंतप्रधान मोदी यांनी पुनरुच्चार केला.

* * *

S.Kane/S.Chitnis/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai