Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांतर्फे नवनिर्वाचित राष्ट्रपती कोविंद यांचे अभिनंदन


राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामनाथ कोविंद यांचे अभिनंदन केले आहे. “राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल रामनाथ कोविंद यांचे अभिनंदन ! आपला कार्यकाळ फलदायी आणि प्रेरणादायी ठरो या शुभेच्छा.
रामनाथ कोविंद यांना खासदारांकडून आणि विविध राज्यांकडून मिळालेल्या भरभरुन पाठिंब्यामुळे आनंद झाला. सर्व सदस्यांचे आभार.

मीरा कुमार यांचेही अभिनंदन. त्यांचा प्रचार लोकशाही मूल्यांना साजेसा होता, ज्याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/S.Kulkarni/P.Malandkar