Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या हस्ते 11 डिसेंबरला महान तमिळ कवी आणि स्वातंत्र्यसैनिक सुब्रमण्यम भारती यांच्या संपूर्ण कार्याच्या संग्रहाचे प्रकाशन


नवी दिल्ली, 10 डिसेंबर 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी, नवी दिल्लीतील 7 लोक कल्याण मार्ग, येथे दुपारी 1 वाजता महान तमिळ कवी आणि स्वातंत्र्यसैनिक सुब्रमण्य भारती यांच्या संपूर्ण कार्यावरील संग्रहाचे प्रकाशन करण्‍यात येणार आहे.

सुब्रमण्यम  भारती यांच्या लेखनाने लोकांमध्ये देशभक्ती जागृत केली, त्यांनी  भारतीय संस्कृती आणि देशाच्या आध्यात्मिक वारशाचे सार जनतेपर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचवले. सुब्रमण्‍यम  भारती  यांच्या संपूर्ण कामांची नोंद 23 खंडांच्या  संचांमध्‍ये केली आहे.हे खंड  सीनी विश्वनाथन यांनी संकलित आणि संपादित केले  आहेत तर अलायन्स पब्लिशर्सने ते  प्रकाशित केले आहेत. या ग्रंथांमध्‍ये  सुब्रमण्यम  भारती यांच्या लेखनाच्या आवृत्त्या, स्पष्टीकरण, दस्तऐवज, पार्श्वभूमीची  माहिती आणि तत्वज्ञानविषयक सादरीकरणाचा तपशील आहे.

 
S.Kane/S.Bedekar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com