Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या हस्ते सूरत इथे बहु-वैशिष्ट्य रुग्णालय, हिरे निर्मिती एककचं उद्‌घाटन

पंतप्रधानांच्या हस्ते सूरत इथे बहु-वैशिष्ट्य रुग्णालय, हिरे निर्मिती एककचं उद्‌घाटन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सूरत इथे किरण बहु-वैशिष्ट्य रुग्णालय आणि हरे कृष्ण एक्‍सपोर्ट प्रा. लि. च्या हिरे निर्मिती एककचे उद्‌घाटन केले.

रुग्णालय उभारण्यासाठी समर्पित भावनेने केलेले कार्य स्तुत्य असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. तसेच या अत्याधुनिक रुग्णालयाचा नागरीकांना फायदा होईल, असेही ते म्हणाले. गरीबांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा मिळायलाच हव्यात असे, पंतप्रधानांनी अधारेखित केले. यासंदर्भात बोलतांना त्यांनी औषधांच्या तसेच ट्युब आदींच्या किंमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारने उचललेल्या पावलांबद्दल सांगितले. गरीब आणि मध्यम वर्गीयांना परवडणाऱ्या किंमतीत आरोग्य सेवा देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. प्रतिबंधक आरोग्य सेवा देण्यावर लक्ष केंद्रीत करण्याबाबत बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, स्वच्छ भारत अभियान हे आरोग्यदायी भारताच्या दिशेने होणाऱ्या प्रयत्नांशी निगडीत आहे.

सूरत शहराने हिरे उद्योगावर ठसा उमटवला असला, तरी आता संपूर्ण रत्नं आणि दागिने क्षेत्राकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे पंतप्रधान म्हणाले. रत्नं आणि दागिने क्षेत्राबाबत आता केवळ ‘मेक इन इंडिया’च नाही तर, ‘डिझाइन इन इंडिया’ असेही ध्येय असले पाहिजे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

B.Gokhale/J.Patankar/D.Rane