Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या हस्ते श्रीनगरमधील किशनगंगा जलऊर्जा प्रकल्प देशार्पण

पंतप्रधानांच्या हस्ते श्रीनगरमधील किशनगंगा जलऊर्जा प्रकल्प देशार्पण


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमधील किशनगंगा जलऊर्जा प्रकल्प समारंभपूर्वक देशार्पण केला.

श्रीनगर रिंगरोडची पायाभरणीही पंतप्रधानांनी यावेळी केली.

उपस्थितांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी गेल्या चार वर्षात जम्मू आणि कश्मीरला दिलेल्या भेटींच्या आठवणींना उजाळा दिला.

रमझानचा पवित्र महिना हा प्रेषित मोहम्मदाची शिकवण आणि संदेश यांचे स्मरण करण्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

राज्याची विजेची गरज भागवण्याच्या दृष्टीने 330 मेगावॅट क्षमतेचा किशनगंगा जलऊर्जा प्रकल्प उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

जम्मू, कश्मीर आणि लडाख या तिन्ही प्रदेशाच्या संतुलित विकासाच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला.

B.Gokhale/M.Pange/D.Rane