Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या हस्ते लंडनमध्ये बसवेश्वर, पुतळ्याचे अनावरण तसेच डॉ आंबेडकर स्मारकाचे उद्‌घाटन

पंतप्रधानांनी जाग्वार-लँड रोव्हर कंपनीच्या कारखान्याला भेट दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लंडनमधील लॅम्बेथ येथे बसवेश्वरांच्या पुतळ्याचे अनावरण केले.

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, पॅरिसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने आपल्याला फार दुःख झाले. हा केवळ फ्रान्सच्या जनतेवरील हल्ला नाही तर हा संपूर्ण मानवजातीवरील हल्ला आहे, याप्रसंगी जगातील सर्वांनी एकत्र येऊन ठामपणे लढण्याची आवश्यकता आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवादाची व्याख्या निश्चित करण्याची नितांत आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.

बसवेश्वर हे श्रेष्ठ तत्वज्ञ आणि समाजसुधारक असल्याचे ते म्हणाले, त्यांनी त्यांच्या काळातील सामाजिक अपप्रवृत्तींविरुद्ध लढा दिला तसेच शेवटच्या घटकापर्यंत लोकशाही पोहचवण्यासाठी प्रयत्न केले.

पंतप्रधानांच्या हस्ते लंडन येथील किंग हेन्री रस्त्यावरील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे उदघाटन करण्यात आले. पंतप्रधानांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्तीही प्रज्वलित केली. यावेळी त्यांनी स्मारकाच्या लोकार्पण कोनशिलेचेही अनावरण केले. “डॉ आंबेडकरांनी सर्व अडथळ्यांवर आणि अडीअडचणींवर मात करत या ठिकाणीच ज्ञान ग्रहण केले,” असे पंतप्रधानांनी अभ्यागतांच्या नोंदपुस्तिकेत लिहिले.

“समाजातील वंचितांच्या कल्याणासाठी अविरतपणे कार्य करणाऱ्या महामानवाला वंदन,” असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी सोलिहल येथील जाग्वार-लँड रोव्हर कंपनीच्या कारखान्याला भेट दिली.

S. Thakur/S.Tupe/N.Sapre