Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या हस्ते बोटाडा येथे “सौनी” योजनेशी संबंधित प्रकल्पांचा शुभारंभ

पंतप्रधानांच्या हस्ते बोटाडा येथे “सौनी” योजनेशी संबंधित प्रकल्पांचा शुभारंभ


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सौनी अर्थात “सौराष्ट्र नर्मदा अवतरण इरिगेशन” योजनेचा पहिला टप्पा (जोडणी 2) राष्ट्राला समर्पित केला. तसेच त्यांनी “सौनी” योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजनही केले.

तत्पूर्वी त्यांनी पुष्पांजली अर्पण करुन नर्मदा जलाचे कृष्णा सागर तलावात स्वागत केले.

पाणी हे निसर्गाचे पवित्र देणे असल्याचे पंतप्रधानांनी सभेत बोलतांना सांगितले. नर्मदा नदीच्या आशिर्वादाने सौराष्ट्रात पाणी प्रयत्नांना यश आले असून, यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.

नर्मदा तसेच नदी जल संवर्धनासंदर्भात केलेल्या कार्याबाबत त्यांनी मध्य प्रदशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे कौतुक केले. ठिबक सिंचनाचा व्यापक उपयोग करण्यावर त्यांनी भर दिला. कृषी क्षेत्राचे उत्पन्न दुप्पट व्हावे, यासाठी केंद्र सरकार अनेक योजनांवर कार्य करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

B.Gokhale/J.Patanakar/Anagha