Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या हस्ते बिहारमध्ये 33 हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे अनावरण

पंतप्रधानांच्या हस्ते बिहारमध्ये 33 हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे अनावरण

पंतप्रधानांच्या हस्ते बिहारमध्ये 33 हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे अनावरण

पंतप्रधानांच्या हस्ते बिहारमध्ये 33 हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे अनावरण


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बरौनी येथे बिहारच्या विकासासाठीच्या 33 हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे अनावरण केले. यावेळी बिहारचे राज्यपाल लालजी टंडन, मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री सुशील मोदी आणि केंद्रीय अन्न आणि ग्राहक मंत्री रामविलास पासवान उपस्थित होते. त्यानंतर पंतप्रधानांनी एका सभेला संबोधित केले.

पंतप्रधानांनी डिजिटल पद्धतीने 13,365 कोटी रुपयांच्या पाटणा मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी केली. पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित असून यामुळे पाटणा आणि लगतच्या भागातली सार्वजनिक वाहतूक सुगम होणार आहे.

जगदीशपूर-वाराणसी नैसर्गिक गॅस पाईपलाईनचा फुलपूर-पाटणा अशा विस्ताराचे उद्‌घाटन त्यांनी केले. ज्या योजनांची पायाभरणी आपल्या हस्ते होते त्याचे उद्‌घाटनही आपल्या हस्ते होते, याचे हे आणखी एक उदाहरण असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या प्रकल्पाची सुरुवात जुलै 2015 मध्ये आपल्या हस्ते झाल्याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. ‘पाटणाला पाईपद्वारे गॅस पुरवण्याव्यतिरिक्त स्थानिक उद्योगांना हा प्रकल्प गॅसचा पुरवठा करेल. तसेच पुनरुज्जीवित बरौनी खत कारखान्यालाही गॅस पुरवठा करेल. गॅस आधारित परिसंस्थेमुळे या भागातील युवा पिढीसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील’, असे पंतप्रधानांनी सांगितले.

पूर्व भारत आणि बिहारच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार प्रतिबद्ध असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. प्रधानमंत्री ऊर्जा गंगा योजनेंतर्गत वाराणसी, भुवनेश्वर, कटक, पाटणा, रांची आणि जमशेदपूर गॅस पाईपलाईनद्वारे जोडले जात आहेत. पाटणा शहर गॅस वितरण प्रकल्पाचे उद्‌घाटन पंतप्रधानांनी केले.

पायाभूत सुविधा आणि मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी 70 वर्षांहून अधिक काळ संघर्ष करणाऱ्या वंचित घटकातील नागरिकांची उन्नती या दोन बिंदूंवर रालोआ सरकारचा विकासाचा दृष्टीकोन आधारित असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले आणि गरिबांच्या उन्नतीसाठी प्रतिबद्धता व्यक्त केली.

बिहारमधल्या आरोग्य देशभाल व्यवस्थेच्या विस्तारीकरणाचे अनावरण करताना ते म्हणाले, आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या दृष्टीने बिहारसाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. छपरा आणि पूर्णिया येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन केली जातील तर गया आणि भागलपूर येथील वैद्यकीय महाविद्यालये अद्ययावत केली जतील. पाटणा येथे एम्सची स्थापना झाली असून राज्यात आणखी एक एम्स स्थापन करण्यावर काम सुरू आहे.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशात उसळलेला क्षोभ, दु:ख, वेदना याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. पंतप्रधान म्हणाले, जी आग तुमच्या हृदयात पेटली आहे तिच आग माझ्याही हृदयात आहे. देशासाठी शहीद झालेले पाटण्याचे संजय कुमार सिन्हा आणि भागलपूरचे रतनकुमार ठाकूर यांना पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिली. या दु:खाच्या क्षणी संपूर्ण देश शहीदांच्या कुटुंबांसोबत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

बरौनी रिझायनरी विस्तार प्रकल्पाच्या 9 एमएमटी एव्हीयूची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झाली.

बरौनी येथे अमोनिया-युरिया खत संकुलाची पायाभरणी पंतप्रधानांनी केली.

बरौनी-कुमेदपूर, मुझफ्फरपूर-रक्सौल, फतुहा-इस्लामपूर, बिहारशरीफ-दानियानवाला या क्षेत्रातील रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचे उद्‌घाटन पंतप्रधानांनी केले. रांची-पाटणा वातानुकुलित एक्सप्रेस गाडीचे उद्‌घाटनही पंतप्रधानांनी केले.

B.Gokhale/S.Kakade/P.Kor