घोषणा
जपानने,29 ऑक्टोबर 2018 ला अनुमोदन पत्र सादर करत,आंतरराष्ट्रीय सौर आघाडीत सहभागी होत असल्याचे, जाहीर केले. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी चौकटीच्या करारावर (आयएसए एफए) आतापर्यंत 70 देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत आणि 47 देशांनी त्याला मान्यता दिली आहे. या करारवर स्वाक्षरी करणारा जपान हा 71 वा देश ठरला आहे आणि या कराराला मान्यता देणारा तो 48 वा देश आहे.
येन मधे देण्यात येणाऱ्या सात ऋण प्रकल्पांशी संबंधित कागदपत्रांचे आदान प्रदान करण्यात आले. यात मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे, उमियम-उमत्रू हायड्रो इलेक्ट्रिक टप्पा 3 चे आधुनिकीकरण आणि अद्ययावतीकरण, दिल्ली मास रॅपीड वाहतूक यंत्रणा प्रकल्प,टप्पा 3, ईशान्य रस्ते जाळे कनेक्टीविटी सुधारणा प्र्काप्ल,तुर्गा पंप स्टोअरेज बांधणी प्रकल्प,चेन्नई परिघीय रिंग रोड आणि त्रिपुरा मधे शाश्वत पाणलोट वन व्यवस्थापन प्रकल्प यांचा समावेश आहे.( 316.458 अब्ज येन पर्यंत एकूण कर्ज तरतूद करण्यात आली आहे.)
ए |
संरक्षण आणि धोरणात्मक |
|
1 |
जपान मेरीटाईम सेल्फ डिफेन्स फोर्स आणि भारतीय नौदल यांच्यात अधिक सहकार्यासाठी कार्यान्वयन व्यवस्था |
जपान मेरीटाईम सेल्फ डिफेन्स फोर्स आणि भारतीय नौदल यांच्यात सागरी क्षेत्र जागरूकतेत अधिक सहकार्य आणि माहिती आदान प्रदानासाठी |
बी |
डिजिटल आणि नव तंत्रज्ञान |
|
2 |
जपान- भारत डिजिटल भागीदारीसंदर्भात जपानची अर्थव्यवस्था, व्यापार आणि उद्योग मंत्रालय आणि भारताचे इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार |
जपानची ‘सोसायटी 5.0’ आणि भारताचे डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी,स्टार्ट अप इंडिया यासारख्या कार्यक्रमात कृत्रिम बुद्धीमत्ता,इंटरनेट ऑफ थिंग्ज यासाख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा लाभ घेणे |
3
|
नीती आयोग आणि जपानची अर्थव्यवस्था,व्यापार आणि उद्योग मंत्रालय यांच्यात कृत्रिम बुद्धीमत्ता याबाबत स्टेटमेंट ऑफ इंटेंट
|
कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानात सहकार्य वाढवणे आणि प्रोत्साहन देणे |
सी |
आरोग्य सेवा आणि वेलनेस |
|
4 |
आरोग्य सेवा आणि वेलनेस क्षेत्रात भारताचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि जपान सरकारचे आरोग्य सेवा धोरण कार्यालय, कॅबिनेट सचिवालय, जपानचे आरोग्य श्रम आणि कल्याण मंत्रालय यांच्यात सहकार्य करार |
आरोग्य सेवा, बिगर संसर्गजन्य रोग रोखणे, मातृ आणि शिशु आरोग्य, स्वच्छता, आरोग्य आणि वयोवृद्धांची देखभाल यासारख्या क्षेत्रात भारत आणि जपान यांच्यात सहकार्याला वाव असणारी संभाव्य क्षेत्रे जाणण्यासाठी ढाचा तयार करणे |
5 |
भारताचे आयुष मंत्रालय आणि जपानचे कानागावा प्रांतीय सरकार यांच्यात आरोग्य सेवा आणि वेलनेस क्षेत्रात सहकार्य करार |
भारताचे आयुष मंत्रालय आणि जपानचे कानागावा प्रांतीय सरकार यांच्यात आरोग्य सेवा आणि वेलनेस क्षेत्रात सहकार्य करार |
6 |
अन्न सुरक्षितता क्षेत्रात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (एफएसएसएआय) आणि जपानचे खाद्य सुरक्षा आयोग, जपानची ग्राहक व्यवहार एजन्सी आणि जपानचे आरोग्य, श्रम आणि कल्याण मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार |
अन्न सुरक्षा क्षेत्रात भारत आणि जपान यांच्या एजन्सीमधे सहकार्य वाढवणे |
डी |
अन्नधान्य मूल्य शृंखला आणि कृषी क्षेत्र |
|
7 |
अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रात अन्न प्रक्रिया आणि उद्योग मंत्रालय आणि जपानचे कृषी,वन आणि मत्स्यालय मंत्रालय यांच्यात सहकार्य करार |
स्थानिक सरकार,खाजगी कंपनी यासारख्या संबंधितांच्या सहभागाने भारताचा अन्न प्रक्रिया उद्योग विकसित करणे |
8 |
कृषी आणि मत्स्य पालन क्षेत्रात जपानद्वारे भारतात गुंतवणूक वाढावी यासाठी भारताचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आणि जपानचे कृषी, वन आणि मत्स्य पालन मंत्रालय यांच्यात कार्यक्रम |
जपानी कंपन्यांसाठी गुंतवणुकीच्या वातावरणात सुधारणा द्वारे कृषी, मत्स्यपालन आणि कृषी मूल्य श्रृंखला विकासाला चालना देणे |
9 |
महाराष्ट्रात अन्न धान्य मूल्य श्रृंखला विकासासाठी महाराष्ट्र सरकार आणि जपानचे कृषी,वन आणि मत्स्यपालन मंत्रालय यांच्यात सहकार्य करार |
महाराष्टाच्या अन्नधान्य मूल्य श्रृंखलेत जपानी कंपन्यांना गुंतवणुकीसाठी सुविधा प्राप्त करून देणे |
10 |
उत्तर प्रदेशात खाद्यान्न मूल्य श्रृंखला विकासाबाबत उत्तर प्रदेश सरकार आणि जपानचे कृषी,वन आणि मत्स्यपालन मंत्रालय यांच्यात सहकार्य करार |
उत्तर प्रदेशच्या अन्नधान्य मूल्य श्रृंखलेत जपानी कंपन्यांना गुंतवणुकीसाठी सुविधा प्राप्त करून देणे |
ई |
आर्थिक |
|
11 |
भारताचे निर्यात पत हमी महामंडळ आणि जपानच्या एनईएक्सआय यांच्यात सामंजस्य करार |
भारत जपान यांच्यात व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी आणि तिसऱ्या देशातल्या प्रकल्पातील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी |
एफ |
टपालविषयक |
|
12 |
टपाल क्षेत्रात भारताचे दूरसंवाद मंत्रालय आणि जपान सरकारचे अंतर्गत व्यवहार आणि दूरसंवाद मंत्रालय |
भारताचे दूरसंवाद मंत्रालय आणि जपान सरकारचे अंतर्गत व्यवहार आणि दूरसंवाद मंत्रालय यांच्यात टपाल सेवा संवाद स्थापित करण्यासह टपाल क्षेत्रात सहकार्य मजबूत करणे |
जी |
विज्ञान आणि तंत्रज्ञान, शैक्षणिक आदान प्रदान आणि पर्यावरण |
|
13 |
भारताची सीएसआयआर आणि जपानचे हिरोशिमा विद्यापीठ यांच्यात संशोधन भागीदारीसाठी सामंजस्य करार |
इलेक्ट्रोनिक्स,सेन्सर्स,हाय स्पीड व्हीजन,रोबोटिक्स,पर्यावरणीय संशोधन, मेक्टाट्रेनिस, कौशल्यपूर्वक परिवहन यासह प्रगत उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी |
14 |
भारताची सीएसआयआर आणि जपानच्या टोकियो विद्यापीठाच्या अद्ययावत विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधन केंद्र यांच्यात संशोधन भागीदारीसाठी सामंजस्य करार |
नवीकरणीय उर्जा, इलेक्ट्रोनिक्स, रोबोटिक्स,एडव्हान्स मटेरियल यासारख्या क्षेत्रात संशोधन भागीदारीला प्रोत्साहन देणे |
15
|
औद्योगिक संशोधन क्षेत्रात,अंतर्विषयक क्षेत्रात संयुक्त संशोधनासाठी, भारताची सीएसआयआर आणि जपानच्या टोकियो येथील टीआयटी यांच्यात सहकार्य करार |
भारताची सीएसआयआर आणि जपानच्या टोकियो इथली टीआयटी यांच्यात एडव्हान्स मटेरियल,जैव विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात संशोधन भागीदारी उभारणे |
16 |
भारताचे दूरसंवाद मंत्रालय आणि जपानचे अंतर्गत व्यवहार आणि दूरसंवाद मंत्रालय यांच्यात टपाल क्षेत्रात सहकार्य करार |
भारताचे दूरसंवाद मंत्रालय आणि जपानचे अंतर्गत व्यवहार आणि दूरसंवाद मंत्रालय यांच्यात टपाल सेवा संवाद स्थापित करण्यासह टपाल क्षेत्रात सहकार्य दृढ करणे |
17 |
पर्यावरण सहकार्याबाबत भारत आणि जपान यांच्यात सहकार्य करार |
भारत आणि जपान यांच्यात पर्यावरण जतन आणि संवर्धन सहकार्याला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी |
18 |
शैक्षणिक आणि संशोधनात्मक देवाण घेवाण करण्यासाठी भारताची एनआयपीईआर आणि जपानचे शिझुओका विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार |
एनआयपीईआर आणि जपानचे शिझुओका विद्यापीठ यांच्यात शैक्षणिक संबंधाना प्रोत्साहन देणे |
19 |
भारतातली आयआयआयटीडीएम कांचीपुरम आणि नागासाकी विद्यापीठ यांच्यात भारत-जपान ग्लोबल स्टार्ट अप बाबत सहकार्य वृद्धिंगत होण्यासाठी सामंजस्य करार |
भारत-जपान ग्लोबल स्टार्ट अप सह माहिती तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ विकास |
20 |
आयआयटी हैदराबाद आणि जपानचे हिरोशिमा विद्यापीठ यांच्यात शैक्षणिक आदान-प्रदान याबाबत सामंजस्य करार. |
उभय संस्थांमध्ये, ,शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आदान प्रदाना द्वारे संयुक्त संशोधनाला प्रोत्साहन देणे |
21 |
आयआयटी हैदराबाद आणि नॅशनल इंस्टिट्युट ऑफ एडव्हान्स इंडस्ट्रीयल सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजी |
उभय संस्थांमध्ये, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आदान प्रदाना द्वारे संयुक्त संशोधनाला प्रोत्साहन देणे |
22 |
करार – आयआयटी कानपूर आणि होकाईडो विद्यापीठाच्या ग्रेज्युएट स्कूल अॅण्ड स्कूल ऑफ इंजीनियरिंग, ग्रेज्युएट स्कूल ऑफ इन्फॉर्मेशन सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजी, ग्रेज्युएट स्कूल ऑफ केमिकल सायन्स अॅण्ड इंजीनियरिंग यांच्यात शैक्षणिक आदान-प्रदान करार सामंजस्य करार- आयआयटी कानपुर आणि ग्रेज्युएट स्कूल अॅण्ड स्कूल ऑफ इंजीनियरिंग, ग्रेज्युएट स्कूल ऑफ केमिकल सायन्स अॅण्ड इंजीनियरिंग यांच्यात विद्यार्थी आदान-प्रदानाबाबत सामंजस्य करार
|
या संस्थांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक आदान-प्रदान या माध्यमातून संयुक्त संशोधनाला प्रोत्साहन देणे |
एच |
क्रीडा |
|
23 |
भारतीय क्रीडा प्राधिकरण ( साई) आणि जपानचे सुकुबा विद्यापीठ यांच्यात शैक्षणिक आदान प्रदान आणि क्रीडा सहकार्य |
संयुक्त कार्यक्रमांच्या माध्यमातून खेळांचा विकास आणि नैपुण्य या क्षेत्रातले सहकार्य दृढ करणे |
आय |
खालील करारांसाठी दस्तावेजांची देवाण-घेवाण |
|
24 |
मुंबई – अहमदाबाद दरम्यान हाय स्पीड रेल्वे (2)निर्मितीसाठी प्रकल्प |
|
25 |
उमियम –उमत्रू जल विद्युत केंद्र, तिसरा टप्पा,यासाठी,नूतनीकरण आणि आधुनिकीकरणासाठी प्रकल्प |
|
26 |
दिल्ली मास रॅपिड ट्रान्सपोर्ट यंत्रणा प्रकल्प ( तिसरा टप्पा ) (III) |
|
27 |
ईशान्य रस्ते नेटवर्क कनेक्टीविटी सुधारणा प्रकल्प ( तिसरा टप्पा ) (I) |
|
28 |
त्रिपुरा शाश्वत पाणलोट वन व्यवस्थापन प्रकल्प |
|
|
जी 2बी/बी2बी करार |
|
29 |
जपानची कागोम कंपनी आणि भारत सरकारचे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार |
|
30 |
भारतीय स्टेट बँक (एसबीआय), (एसबीआय)पेमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड आणि हिताची पेमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात जॉइंट वेंचर करार |
|
31 |
जपानचा निसान स्टील उद्योग कंपनी आणि भारत सरकारचे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार |
|
32 |
भारत आणि जपानला सरकारकडून समर्थन लाभलेल्या आणि भारतात गुंतवणूक करण्यासाठी 57 जपानी कंपन्या आणि जपानमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 15 भारतीय कंपन्यांकडून खाजगी क्षेत्र गुंतवणूक प्रकल्पाच्या प्रस्तावांची स्वीकृती आणि लेटर ऑफ इंटेट |
|
अ.क्र. | सामंजस्य कराराचे/कराराचे नाव | तपशील |
---|
B.Gokhale/N.Chitale/P.Kor