Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाची सहावी बैठक

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाची सहावी बैठक

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाची सहावी बैठक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाची सहावी बैठक आज नवी दिल्लीत झाली.

देशातील आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देऊन ती प्रभावीपणे हाताळणे यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाच्या कामकाजाचा तसेच सध्याच्या प्राधिकरणाच्या प्रकल्पांचा पंतप्रधानांनी आढावा घेतला.

पंतप्रधानांनी संबंधित यंत्रणांमध्ये अधिक चांगला समन्वय असण्यावर भर दिला. जीवित आणि वित्त हानी कमीत कमी व्हावी यासाठी एकत्रित अभ्यास करण्यावरही त्यांनी जोर दिला. आपत्कालीन व्यवस्थापनात जागतिक कौशल्य निर्मिती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली, कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री राधा मोहन सिंह तसेच राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे सदस्य आणि अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

N.Sapre/P.Kor