Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांचे फिलिपाईन्समधील भारतीय समुदायाला संबोधन

पंतप्रधानांचे फिलिपाईन्समधील भारतीय समुदायाला संबोधन

पंतप्रधानांचे फिलिपाईन्समधील भारतीय समुदायाला संबोधन

पंतप्रधानांचे फिलिपाईन्समधील भारतीय समुदायाला संबोधन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फिलिपाईन्समधील मनिला येथे भारतीय समुदायाला संबोधित केले.

 

पंतप्रधान म्हणाले की, आसियान प्रांत भारतासाठी खूप महत्वाचा आहे. आसियान प्रातांबरोबर असलेल्या भारताच्या दीर्घकालीन वारसा आणि भावनिक संबंधांबाबत ते बोलले. त्यांनी प्रामुख्याने बुध्द आणि रामायणाचा उल्लेख केला. हा वारसा जतन करण्यात या प्रांतातील भारतीय समुदाय महत्वाची भूमिका पार पाडू शकतो असे ते म्हणाले.

 

पंतप्रधान म्हणाले की, भारताने कधीही कोणत्याही देशाला हानी पोहचवली नाही. पहिल्या आणि दुसऱ्या जागतिक महायुध्दात विविध भूमींवर आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या दीड लाख भारतीय जवानांच्या बलिदानाचा त्यांनी उल्लेख केला.

 

ते म्हणाले की भारताचा वर्तमान काळ देखील तेवढाच उज्वल  आणि तेजस्वी असायला हवा. 21वे शतक आशियाचे शतक म्हटले जाते, ते भारताचे शतक बनावे यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करायला हवेत असेही ते म्हणाले.

 

गरीबांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने हाती घेतलेल्या जन-धन योजना आणि उज्वला योजना यांसारख्या उपक्रमांची पंतप्रधानांनी माहिती दिली. अनुदानाच्या आधार जोडणीक्षरे मिळत असलेल्या लाभांचा त्यांनी उल्लेख केला.

 

B.Gokhale/S.Kane/Anagha