Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांनी नवी दिल्ली G20 नेत्यांच्या बैठकीमधील घोषणेच्या अंमलबजावणीमधील प्रगतीचा घेतला आढावा


नवी दिल्‍ली, 18 ऑक्‍टोबर 2023

नवी दिल्ली येथील G20 नेत्यांच्या बैठकीमधील घोषणेच्या अंमलबजावणीमधील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली आज एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला नीती आयोगाचे उपाध्यक्ष, G20 शेर्पा, G20 चे मुख्य समन्वयक आणि परराष्ट्र मंत्रालय (MEA), आर्थिक व्यवहार विभाग (DEA) आणि नीति आयोगाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

चालू प्रयत्नांचा एक भाग म्हणून, संबंधित मंत्रालयांच्या पुढाकाराने, सर्व संबंधित विभागांचा समावेश करून सात वेबिनारची मालिका आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. वेबिनार पुढील संकल्पनांवर प्रस्तावित आहेत:

(i) मजबूत, शाश्वत, संतुलित आणि सर्वसमावेशक विकास (ii) शाश्वत विकास उद्दिष्टांच्या  (SDGs) आधारे प्रगतीचा वेग वाढवणे (iii) शाश्वत भविष्यासाठी हरित विकास करार (iv) एकविसाव्या शतकासाठी बहुपक्षीय संस्था (v) तांत्रिक परिवर्तन आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (vi) महिलांच्या नेतृत्वाखालील विकास, आणि (vii) दहशतवाद आणि मनी लाँड्रिंगचा सामना.

त्याशिवाय, नवी दिल्ली येथील G20 नेत्यांच्या घोषणेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा दृष्टीकोन जाणून घेण्यासाठी, देशभरातील विविध विचारवंतांन सहभागी करून  परिसंवादाचे आयोजन करण्याचे नियोजन आहे.

प्रधान सचिव म्हणाले की, घोषणेच्या अंमलबजावणीवर नियमितपणे देखरेख ठेवण्यासाठी एक उच्चस्तरीय देखरेख यंत्रणा स्थापन केली जाईल.

प्रधान सचिवांनी आगामी G20 आभासी परिषदेबाबतही चर्चा केली. पंतप्रधानांनी नवी दिल्ली शिखर परिषदेदरम्यान आपल्या भाषणात या उपक्रमाचा प्रस्ताव ठेवला होता. प्रमुख शिखर परिषदेनंतर एखादा देश अशा प्रकारची आभासी शिखर परिषद आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे, हे लक्षात घेता, प्रधान सचिवांनी सर्व सदस्य-राज्ये आणि अतिथी देशांना माहिती त्वरित प्रसारित करण्याच्या गरजेवर भर दिला.

या बैठकीत G20 नेत्यांच्या घोषणेची यशस्वी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठीची सरकारची वचनबद्धता आणि विकास आणि कल्याणामधील जागतिक सहकार्याला चालना देण्यासाठी समर्पित राहण्यावर भर देण्यात आला.

* * *

R.Aghor/R.Agashe/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai