Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिस्रा यांचा पद त्याग


पंतप्रधानांचे प्रधान सचिव श्री. निपेन्द्र मिस्रा यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे पदत्यागाचा निर्णय घेतला. पंतप्रधानांनी त्यांना दोन आठवडे कार्यकाळ वाढविण्याची विनंती केली होती .

पंतप्रधानांनी पी एम कार्यालयाचे विशेष अधिकारी म्हणून श्री. पी. के. सिन्हा सेवानिवृत्त (भारतीय प्रशासन सेवा यु पी :७७ च्या तुकडीचे )यांची नियुक्ती केली आहे.

एका निवेदनात श्री नृपेंद्र मिश्रा म्हणालेः

“माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची सेवा करणे हा एक विशेषाधिकार आहे. या संधीबद्दल आणि त्यांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो.

या समाधानकारक प्रवासासाठी मी माझा प्रत्येक तास कामासाठी खर्ची केला आहे आणि त्याचा आनंद घेतला आहे. यानंतरचा कार्यकाळ मी सार्वजनिक कार्यांसाठी आणि राष्ट्रीय हितासाठी समर्पित करीन. यासाठी आता पुढे जाण्याची वेळ आली आहे.

मी,सरकारी, बिन सरकारी सहकाऱ्यांचे, मित्रांचे आणि माझ्या कुटुंबाचे आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी स्वतःच्या नेतृत्वाने देशाला उज्ज्वल भविष्याकडे नेले आहे.”

******

B.Gokhale