-सॅन होजेमध्ये पंतप्रधानांचे आगमन, तेस्ला मोटर्सला भेट
-सॅन होजेमध्ये पंतप्रधानांची माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या सीईओंसोबत बैठक
-पंतप्रधानांचे सॅन होजेमध्ये आयोजित डिजीटल इंडिया कार्यक्रम व जी-4 परिषदेत संबोधन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (26 सप्टेंबर 2015) न्यूयॉर्क शहरात जी-4 परिषदेच्या बैठकीला उपस्थित होते. ब्राझीलच्या अध्यक्ष डिल्मा रॉसेफ, जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल आणि जपानचे पंतप्रधान शिंझो आबे हे या परिषदेला उपस्थित होते.
बैठकीचे उद्घाटन करताना पंतप्रधान म्हणाले की, “आपण डिजीटल युगात राहत आहोत. जागतिक अर्थव्यवस्था बदलले कल आहे, विकासाच्या नव्या इंजिनांनी आर्थिक शक्ती विखुरली आहे आणि सांपत्तिक दरी वाढली आहे. लोकसंख्या, नागरिकरण आणि स्थलांतराच्या बदललेले कल यामुळे नवीन आव्हाने निर्माण झाली आहेत. हवामानबदल आणि दहशतवाद हे नवीन चिंतेचे मुद्दे आहेत. सायबर आणि अंतराळ हे संधी आणि आव्हानांचे पूर्णतः नवीन घटक आहेत. तरीही आपल्या संस्था, दृष्टीकोन आणि बऱ्याचवेळी विचारसरणी यातून आपण मागे सोडलेल्या दशकाचे प्रतिबिंब उमटते आपण राहत असलेल्या शतकाचे नाही. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेसंदर्भातही हे तितकेच खरे आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची निश्चित कालमर्यादेत सुधारणा हे तातडीचे व महत्वाचे कार्य आहे.”
बैठकीच्या शेवटी जाहीर केलेले संयुक्त निवेदन असे-“जी-4 नेत्यांनी जास्त प्रतिनिधी असलेली, वैध, प्रभावी सुरक्षा परिषद असावी असे जोर देऊन सांगितले कारण कधी नव्हे ते जागतिक वाद आणि संकट हे अलिकडच्या काळात फार वेगाने वाढले आहेत. हे साध्य करणे शक्य आहे. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेसाठी 21 व्या शतकात जास्तीत जास्त सभासद राष्ट्रांची क्षमता आणि इच्छा यामुळे हे शक्य आहे.”
सॅन होजेमध्ये आगमन
पंतप्रधानांचे नंतर सॅन होजे, कॅलिफोर्निया येथे आगमन झाले. त्यावेळी भारतीय वंशाच्या अमेरिकी समुदायाने त्यांचे उत्साहपूर्वक स्वागत केले. पंतप्रधानांनी यावेळी भारतीय समुदायाच्या लोकांच्या भेटी घेतल्या.
तेस्ला मोटर्सला भेट
पंतप्रधानांनी तेस्ला मोटर्सला भेट दिली. कंपनीचे सीईओ श्री इलॉन मस्क यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी पंतप्रधानांना कंपनीच्या नवनवीन संशोधनांची माहिती दिली. पंतप्रधानांनी फॅक्टरीलाही भेट दिली. नवीकरणीय ऊर्जा, तेस्ला मोटर्सचे बॅटरी तंत्रज्ञान, ऊर्जा संवर्धनासाठी नवकल्पना हे इलॉन मस्क व पंतप्रधानांदरम्यान झालेल्या चर्चेतील प्रमुख मुद्दे होते. तेस्ला येथे काम करणाऱ्या भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्यांची पंतप्रधानांनी भेट घेतली.
माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या सीईओंसोबत बैठक, डिजीटल इंडिया कार्यक्रमात संबोधन
पंतप्रधानांनी ॲपल कंपनीचे सीईओ श्री टीम कूक यांची भेट घेतली. आमच्या कंपनीच्या लेखी भारताला एक विशिष्ट स्थान आहे, कारण स्टीव्ह जॉब्ज, ऍपल कंपनीचा सह-संस्थापक प्रेरणेसाठी भारतात जाऊन आल्याचे कूक म्हणाले. डिजीटल इंडियामध्ये ॲपल कंपनी कशाप्रकारे भागीदार होऊ शकते यावरही यावेळी चर्चा झाली.
पंतप्रधानांनी श्री सत्या नडेला (मायक्रोसॉफ्ट), श्री सुंदर पिचाई (गुगल), श्री शंतनू नारायण (ऍडोब), श्री पॉल जॅकोब्ज (क्वालकोम), श्री जॉन चेम्बर्स (सीस्को) यांची भेट घेतली. नंतर या सर्वांसोबत पंतप्रधानांनी डिजीटल इंडिया कार्यक्रमात स्नेहभोज घेतले.
पंतप्रधानांनी यावेळी आपल्या संबोधनात, भारताच्या डिजीटल इंडियाविषयीच्या आराखड्याविषयी सांगितले.
पंतप्रधान म्हणाले- “… आजच्या या डिजीटल युगात, आपल्या लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणण्याची संधी आहे, ज्याची मागील दोन दशकांमध्ये कल्पनाही केली नव्हती. आपण नुकतेच मागे सोडलेल्या शतकापेक्षा हे आपल्याला याच मुद्यावर वेगळे करते. आजही काही लोकांना वाटत असेल की डिजीटल अर्थव्यवस्था ही श्रीमंत, शिक्षित लोकांसाठीच आहे. पण, तुम्ही टॅक्सीचालकाला विचारा अथवा एखाद्या फेरीवाल्याला विचारा की त्याला फोनपासून काय मिळाले, ही चर्चा याठिकाणीच थांबेल. माझ्या मते तंत्रज्ञान हे सबलीकरणाचे साधन आहे जे आशा आणि संधी यांना जोडणारा सेतू आहे. सोशल मिडीयामुळे सामाजिक अडथळे दूर होत आहेत. तो लोकांना ओळखीच्या आधारे नाही तर मानवी मूल्यांच्या आधारे जोडण्याचे काम करतो. आज, तंत्रज्ञान विकसित होत आहे ज्यामुळे नागरिक सक्षम होत आहे आणि एकेकाळी लोकशाहीत त्यांची घटनात्मक शक्ती काढून घेतली होती. तंत्रज्ञानामुळे सरकारांना मोठ्या प्रमाणात तपशील जाहीर करावा लागत आहे आणि 24 तासात नाही तर 24 मिनिटांमध्ये उत्तर द्यावे लागत आहे. सोशल मिडीयाच्या विस्ताराचा प्रचंड वेग पाहिला तर तुमचा विश्वास बसणार नाही की ज्यांना आशा नव्हती त्यांच्या आयुष्यात वेगाने परिवर्तन झाले आहे. म्हणूनच मित्रांनो याच श्रद्धेतून डिजीटल इंडियाचा जन्म झाला आहे. भारताच्या परिवर्तनासाठी हा महत्वाचा घटक ठरला आहे, कदाचित मानवी इतिहासात यापूर्वी कधीही नव्हता असा. यामुळे केवळ समाजातील दुर्बल, दूरस्थ आणि गरिबातील गरीब व्यक्तीचे आयुष्य बदलले असे नव्हे तर राष्ट्राची काम करण्याची आणि जगण्याची पद्धती बदलली आहे.”
S.Thakur/S.Tupe
A historic G4 Summit after a decade. We had comprehensive deliberations on reforms of the UNSC. Sharing my remarks. http://t.co/IuTjeNPZWT
— Narendra Modi (@narendramodi) September 26, 2015
My gratitude to President @dilmabr, Chancellor Merkel & PM @AbeShinzo for gracing the summit & sharing their valuable views on UNSC reforms.
— Narendra Modi (@narendramodi) September 26, 2015
More representative, legitimate & effective UNSC is needed to address global conflicts. Here is the joint statement. http://t.co/L7ho6yXHKM
— Narendra Modi (@narendramodi) September 26, 2015
Landed in San Jose to a great welcome. Eagerly awaiting the programmes in the coming 2 days. pic.twitter.com/CetJtnzuYX
— Narendra Modi (@narendramodi) September 26, 2015
A picture of my meeting with leading CEOs of the Tech world. pic.twitter.com/A7UOlvvDdx
— Narendra Modi (@narendramodi) September 27, 2015
Valuable interaction with @tim_cook on a wide range of issues. pic.twitter.com/hpZlCtfioG
— Narendra Modi (@narendramodi) September 27, 2015
Thanks @elonmusk for showing me around at @TeslaMotors.Enjoyed discussion on how battery technology can help farmers pic.twitter.com/r2YuSPPlty
— Narendra Modi (@narendramodi) September 27, 2015
Some more photos of my visit to @TeslaMotors. pic.twitter.com/0tORRecM0j
— Narendra Modi (@narendramodi) September 27, 2015