नवी दिल्ली, 26 मार्च 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी दिलेल्या निमंत्रणावरून ढाक्यात भेटीदाखल आगमन झाले.ही ऐतिहासिक भेट , शेख मुजबूर रहमान यांची जन्मशताब्दी-मुजीब बोर्शो साजरी करण्यासाठी, तसेच भारत आणि बांगलादेश यांच्यातील राजनैतिक संबंधांना 50 वर्षे पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ आणि बांगलादेशाच्या स्वातंत्र्ययुध्दाला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने होत आहे.
पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी हे विशेष बाब म्हणून पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करण्यासाठी हझरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपस्थित होते .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावेळी गार्ड ऑफ ऑनर आणि 19 तोफांची सलामी देण्यात आली .
Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
A special visit begins with a special gesture.
— PMO India (@PMOIndia) March 26, 2021
PM Sheikh Hasina welcomes PM @narendramodi at Dhaka airport. pic.twitter.com/5zyKWpIepv