Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांचे कॅलिफोर्नियातील कार्यक्रम- 27 सप्टेंबर 2015

पंतप्रधानांचे कॅलिफोर्नियातील कार्यक्रम- 27 सप्टेंबर 2015

पंतप्रधानांचे कॅलिफोर्नियातील कार्यक्रम- 27 सप्टेंबर 2015

पंतप्रधानांचे कॅलिफोर्नियातील कार्यक्रम- 27 सप्टेंबर 2015

पंतप्रधानांचे कॅलिफोर्नियातील कार्यक्रम- 27 सप्टेंबर 2015

पंतप्रधानांचे कॅलिफोर्नियातील कार्यक्रम- 27 सप्टेंबर 2015

पंतप्रधानांचे कॅलिफोर्नियातील कार्यक्रम- 27 सप्टेंबर 2015

पंतप्रधानांचे कॅलिफोर्नियातील कार्यक्रम- 27 सप्टेंबर 2015

पंतप्रधानांचे कॅलिफोर्नियातील कार्यक्रम- 27 सप्टेंबर 2015

पंतप्रधानांचे कॅलिफोर्नियातील कार्यक्रम- 27 सप्टेंबर 2015

पंतप्रधानांचे कॅलिफोर्नियातील कार्यक्रम- 27 सप्टेंबर 2015

पंतप्रधानांचे कॅलिफोर्नियातील कार्यक्रम- 27 सप्टेंबर 2015

पंतप्रधानांचे कॅलिफोर्नियातील कार्यक्रम- 27 सप्टेंबर 2015


फेसबुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅलिफोर्नियातील फेसबूक मुख्यालयाला भेट दिली. पंतप्रधान व फेसबूक मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी टाऊनहॉल प्रश्नोत्तरात सहभाग घेतला.

यावेळी पंतप्रधानांनी विविध मुद्यांवरील प्रश्नांना उत्तरे दिली. जगाने भारताबद्दल आशावादी का असावे हे पंतप्रधानांनी स्पष्ट करुन सांगितले तसेच त्यांचे भारतीय अर्थव्यवस्थेला 20 ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले. स्टीव्ह जॉब्जने मार्क झुकेरबर्गला भारतातील मंदिरात जाण्यास सांगितले होते, असे मार्क झुकेरबर्गने सांगितल्यानंतर पंतप्रधानांनी मार्क झुकेरबर्गच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली. अध्यात्म आणि विज्ञान यातील हा एकमेवाद्वितीय दुवा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले की गेल्या 15 महिन्यात जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.

सोशल मिडीया व इंटरनेट हे प्रशासन आणि नागरिक सहभागाचे साधन बनू शकतात का, या प्रश्नावर पंतप्रधान म्हणाले सोशल मिडीयामुळे सरकारला आपल्या कृतीवर काही क्षणातच प्रतिक्रिया मिळतात. चीनच्या वेईबो या सोशल मिडीयावरील त्यांच्या उपस्थितीबाबतही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच त्यांनी इस्रायलच्या जनतेला हिब्रू भाषेतून शुभेच्छा पाठवल्या होत्या व त्याचे उत्तर बेंजामीन नेत्यान्याहू यांनी हिंदीत पाठवल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. राजनीतीचा हा नवीन आयाम असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान कुटुंबाबद्दल विशेषतः आपल्या आईबद्दल बोलताना अतिशय हळवे व भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. आपल्या आईने कसा संघर्ष करुन मुलांना वाढवले हे त्यांनी सांगितले. ही संघर्षाची गाथा फक्त आपल्या आईचीच नाही तर भारतातील कित्येक मातांची आहे, असे ते म्हणाले. शासनव्यवस्थेतील निर्णयप्रक्रियेत महिलांना सहभागी करुन घेण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

गुगल

पंतप्रधानांनी गुगलच्या मुख्यालयाला भेट दिली, याठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. यावेळी पंतप्रधानांना गुगलच्या नवकल्पना आणि भविष्यातील योजनांविषयी थोडक्यात माहिती देण्यात आली. यावेळी श्री इरिक श्मिट आणि श्री लॅरी पेज हेही उपस्थित होते. गुगल अर्थच्या सहाय्याने पंतप्रधानांनी पाटण्याजवळ असलेले खगोल गाव पाहण्याची इच्छा व्यक्त केली. याठिकाणी प्राचीन काळातील खगोल शास्त्रज्ञ आर्यभट्ट यांची वेधशाळा होती.

अक्षय ऊर्जेबाबत गोलमेज बैठक

पंतप्रधानांनी अमेरिकेचे ऊर्जामंत्री श्री अर्नेस्ट मोनीझ यांची भेट घेतली. नंतर त्यांनी अक्षय ऊर्जेसंदर्भातील गोलमेज बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले. या बैठकीला अमेरिकेचे ऊर्जामंत्री डॉ. अर्नेस्ट मोनीझ, माजी ऊर्जामंत्री प्रो. स्टीवन चौ यांची उपस्थिती होती.

आघाडीच्या ऊर्जा कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गुंतवणूकदार, अहमद छतीला, सीईओ सनएडीसन, निकेश अरोरा, अध्यक्ष आणि सीओओ सॉफ्टबँक, के. आर. श्रीधर, सीईओ ब्लूम एनर्जी, जोनाथन वॉल्फस्न सीईओ सोलाझाईम, जॉन डिअर वेन्चर कॅपिटालिस्ट व इरा ईरेन्प्रेईस या डिबीएल पार्टर्न्स भागीदारांची उपस्थिती होती.

स्टॅन्फोर्ड विद्यापीठाचे प्रो अर्जुन मजुमदार, प्रो रॉजर नॉल, डॉ अंजना कोच्चर, प्रो सॅली बेन्सन यांचाही या चर्चेत सहभाग होता.

या परिषदेत एकसुराने भारत हा स्वच्छ ऊर्जेसंदर्भात जगाची राजधानी होऊ शकतो असे ठाम मत व्यक्त करण्यात आले.

स्वच्छ व नवीकरणीय ऊर्जा लवकरच स्वस्त दराने मिळणारा पर्याय ठरेल, कारण विदयुत संग्राहक स्वस्त दराने मिळेल, असे प्रतिपादन सहभागितांनी केले. भारतातील राज्य आणि शहरांना स्वच्छ ऊर्जा उपक्रमात पुढाकार घेण्यासाठी परवानगी द्यावी असे सहभागी झालेल्या सर्वांचे मत होते.

यासंदर्भात असा विचार पुढे आला की, भारताचे 175 गिगावॅट एवढे नवीकरणीय ऊर्जेचे उद्दिष्ट आहे, त्यासाठी सध्याचे ग्रीड अनुकूल नाहीत, म्हणून त्याला पूरक आणखी ग्रीड उभारण्याची गरज आहे. तसेच 175 गिगावॅटचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी खासगी भागीदारीही महत्वाची आहे. इस्रायलने खासगी भागीदारीच्या सहकार्याने पाण्याच्या टंचाईचा प्रश्न सोडवल्याचे उदाहरण यावेळी देण्यात आले.

सहभागी झालेल्यांनी आपली मते प्रदर्शित केल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले. भारत 175 गिगावॅट ऊर्जेच्या उद्दिष्टासंदर्भात कटीबद्ध असल्यावर पंतप्रधानांनी भर दिला. या क्षेत्रात गुंतवणूकीला प्रचंड संधी असल्याचे ते म्हणाले. उदाहरण म्हणजे रेल्वेचे, यात शंभर टक्के थेट परकीय गुंतवणूकीला परवानगी देण्यात आली आहे. सरकार डिस्कॉमच्या आर्थिक स्थितीत कशी सुधारणा करता येईल यावर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी नवीकरणीय ऊर्जेबाबत यापूर्वीच घेतलेल्या पुढाकारांची माहिती यावेळी दिली. कोची विमानतळ हे सौर-ऊर्जेवर आधारित विमानतळ बनत आहे आणि गुजरातमध्ये कालव्यांवर सौर पटल बसवण्यात आले आहेत. त्यांनी सांगितले की, अगदी पुढच्या महिन्यात झारखंडमधील आदिवासी पट्ट्यातील एक जिल्हा न्यायालय पूर्णपणे सौर-ऊर्जेवर आधारित होणार आहे. पंतप्रधानांनी कोळसा क्षेत्र संशोधनासाठी महत्वाचा भाग असल्याचे सांगितले. आगामी दशकात अक्षय ऊर्जा क्रांती घडून येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

स्टार्ट अप कनेक्ट

पंतप्रधानांनी स्टार्ट अप कनेक्ट या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित केले. भारतीय स्टार्ट अपसाठी आपल्या नवकल्पना हे दाखवण्याचे व्यासपीठ ठरले.

त्यांनी भारतीय स्टार्ट अप साठी असलेली आपली भूमिका विशद केली.

“तंत्रज्ञानाची एककेंद्राभिमुखता, भिन्न क्षेत्रांमधली एकात्मता, वितरीत स्थापत्यकला आणि एखाद्या कल्पनेला पाठिंबा देण्याची लोकांची भूमिका यामुळे उद्योजकांसाठी नवे जग खुले झाले आहे. ही जैवसंस्था कॅलिफोर्नियात जन्माला आली. कॅलिफोर्नियाच्या तटावर जगाला आकार देण्याचे जेवढे काम होते ते अन्यत्र कुठेही होत नाही. फक्त मोठे उद्योगसमूहच नाही तर छोटे उद्योजक मानव जातीला निर्मितीचा आनंद देण्यासाठी दररोज नवनवीन कल्पना घेऊन येत आहेत. हे अमेरिकेच्या यशाचे गमक आहे आणि जगाची प्रेरणा आहे. म्हणून मी भारतात परिवर्तनासाठी व युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी स्टार्ट अप, तंत्रज्ञान आणि नवकल्पना प्रभावी साधन असल्याचे मानतो. आपल्याकडे 35 वर्षापेक्षा कमी वयोगटातील 800 दशलक्ष लोकसंख्या आहे. हे सर्व परिवर्तनासाठी उत्सूक आहेत. ते साध्य करण्यासाठी त्यांच्याकडे उत्साह आणि वेग आणि आत्मविश्वास आहे. जर 500 नगरांनी दहा स्टार्ट अप आणि सहा लाख खेड्यांपैकी सहा जणांनी जरी छोटा उद्योग सुरू केला तरी आपल्या देशातील मोठ्या संख्येने तरुणांना नियमित रोजगार उपलब्ध होईल. भारताची स्वतःची स्टार्ट अप पद्धती ही वेगाने विकसित होत आहे. जी आमच्या तरुणांची ऊर्जा, उद्योजकता आणि नवकल्पांनी भरलेली आहे.”

यावेळी पंतप्रधानांनी भारत निधीचा शुभारंभ केला- यात चांगले आरोग्य, कृषी, पुनर्नवीकरण आणि तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. यावेळी सात परस्पर सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

भारतीय समुदायासमोर भाषण

पंतप्रधानांनी सॅप परिसरात भारतीय समुदायाला संबोधित केले. यावेळी त्यांनी भारत-अमेरिका भागीदारी ही लोकशाहीची तत्वे आणि नवकल्पनांवर आधारित असल्याचे सांगितले. गेल्या पंधरा महिन्यात सरकारने केलेल्या कामांचा तपशील त्यांनी लोकांसमोर मांडला. सामाजिक परिवर्तनात योगदान देऊन जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलल्याबद्दल सिलिकॉन व्हॅलीमध्ये काम करणाऱ्या भारतीय आयटी उद्योजकांचे पंतप्रधानांनी कौतुक केले.

S.Thakur/M.Desai