Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांची संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांशी भेट

पंतप्रधानांची संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांशी भेट


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस (यूएनएसजी)  महामहीम अँटोनियो गुटेरेस यांची 1 डिसेंबर 2023 रोजी, दुबई येथे कॉप-28 शिखर परिषदेदरम्यान  भेट घेतली.

भारताच्या जी20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात  संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले. त्यांनी हवामानविषयक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भारताच्या पुढाकाराबद्दल आणि प्रगतीविषयक माहिती दिली.

दोन्ही नेत्यांनी संयुक्त राष्ट्रांसह बहुपक्षीय प्रशासन आणि वित्तीय संस्थांमधील हवामान कृती, हवामान वित्त, तंत्रज्ञान आणि सुधारणांशी संबंधित ग्लोबल साउथचे प्राधान्यक्रम आणि आव्हाने यावर विचारविनिमय केला.

संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांनी जी-20 अध्यक्षांच्या अंतर्गत शाश्वत विकास, हवामान कृती, एमडीबी सुधारणा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रात भारताच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. त्यांनी पंतप्रधानांच्या ग्रीन क्रेडिट इनिशिएटिव्हचे स्वागत केले. भारताच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात मिळालेल्या यशाची पुनर्बांधणी करण्यासाठी आणि भविष्यात होणाऱ्या 2024 च्या  संयुक्त राष्ट्र  परिषदेमध्ये  या यशाची पुनरावृत्ती होण्यासाठी त्यांनी भारतासोबत काम करण्याचे आश्वासन दिले.

***

S.Patil/G.Deoda/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai