Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांची वाराणसी येथील तुलसी मानस मंदिर आणि दुर्गा माता मंदिराला भेट . तसेच रामायणावरील टपाल तिकिटाचे प्रकाशन केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी वाराणसी येथील तुलसी मानस आणि दुर्गा माता मंदिराला भेट दिली. तसेच रामायणावरील टपाल तिकिटाचे प्रकाशन सुद्धा केले. या प्रसंगाचे वैशिष्ठ्य सांगताना पंतप्रधान म्हणाले की समाजात तुलसी मानस मंदिराच्या टपाल तिकिटाचे विशेष स्थान राहील.

संस्कृती जतन करण्याचा हा एक चांगला मार्ग असून पंतप्रधानांनी श्री रामाने समाजाला घालून दिलेल्या आदर्शांचा वास्तविक जीवनात प्रत्येक व्यक्तीला कसा लाभ होतो ते सांगितले. यानंतर पंतप्रधानांनी तुलसी मानस मंदिर आणि दुर्गा माता मंदिराला भेट दिली.

पी. आई. बी/ बी. गोखले