Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांची दोहा कामगार शिबिराला भेट


पंतप्रधानांची दोहा कामगार शिबिराला भेट


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डाऊनटाऊन दोहामधील मेशेइर्ब इथल्या प्रकल्प स्थळाला भेट देऊन तिथल्या भारतीय कामगारांशी संवाद साधला.

तिथे उपस्थित कामगारांना संबोधित करताना ते म्हणाले की, दोहामध्ये आल्यानंतर त्यांची पहिली बांधिलकी ही कामगारांना भेटणे ही होती. पंतप्रधान म्हणाले की, कामगारांना भेडसावणाऱ्या समस्यांची त्यांना कल्पना आहे आणि जेव्हा ते कतारच्या नेत्यांना भेटतील तेव्हा ते हे सर्व मुद्दे त्यांच्या समक्ष उपस्थित करतील.

कामगारांसोबत संवाद साधायला जायच्या आधी त्यांनी तिथल्या आरोग्य शिबिराला भेट दिली आणि तिथल्या डॉक्टरांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांची प्रशंसा केली.

भाषण संपल्यानंतर पंतप्रधानांनी प्रत्येक टेबलजवळ जाऊन प्रत्यक्ष कामगारांशी संवाद साधला आणि त्यांच्यामधील काहींसमवेत भोजन केले.

S.Mhatre/B. Gokhale