Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांची छत्तीसगडला भेट, जंगलसफारीचा प्रारंभ, पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळयाचे अनावरण, तसेच राज्योत्सवाचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्तीसगडमधल्या नया रायपूरला भेट दिली. शहरातल्या छोटेखानी जंगल सफारीचे उद्‌घाटन करुन त्यांनी एक भेट या सफारीलाही दिली. पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळयाचे पंतप्रधानांनी अनावरण केले. मध्यवर्ती रस्त्याचे एकात्म प्रथेचे लोकार्पण केले आणि नया रायपूर बीआरटीएस प्रकल्पांचे उद्‌घाटन केले.

“हमार छत्तीसगड योजना” यात सहभागी झालेल्या व्यक्तींची पंतप्रधानांनी भेट घेतली. राज्योत्सवाचे उद्‌घाटनही पंतप्रधानांनी केले. ओडीएफ मोहिमेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दोन जिल्हयातल्या आणि पंधरा विभागातल्या अधिकाऱ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते प्रशस्तीपत्रे देऊन गौरविण्यात आले. उज्वला योजनेअंतर्गंत , पंतप्रधानांनी एलपीजी जोडण्यांचे वाटप केले. तसेच सौर उज्वला योजनेतल्या निवडक लाभार्थींना सौर पंपाचे वाटपही केले.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी छत्तीसगडसह तीन नव्या राज्‍यांची शांतता आणि सलोख्याने निर्मिती केल्याचे स्मरण पंतप्रधानांनी केले.

तुलनेने छोटे असलेले राज्यही विकासाची नवी उंची कशी गाठू शकते याचे दर्शन छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमणसिंह यांनी घडवले आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली. या विकास उपक्रमांचा छत्तीसगडमधल्या भावी पिढयांना लाभ होईल, असेही पंतप्रधान म्हणाले.

छत्तीसगडमध्ये पर्यटनाला मोठा वाव असून त्यामुळे गरीबातल्या गरीबालाही नव्या आर्थिक संधी प्राप्त होईल असे पंतप्रधान म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी उपयुक्त पावले उचलल्याबद्दल पंतप्रधानांनी छत्तीसगडची प्रशंसा केली.

B.Gokhale/N.Chitale/Anagha