Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांची केदारनाथला भेट विविध पायाभूत प्रकल्पांसाठी भूमीपूजन

पंतप्रधानांची केदारनाथला भेट विविध पायाभूत प्रकल्पांसाठी भूमीपूजन

पंतप्रधानांची केदारनाथला भेट विविध पायाभूत प्रकल्पांसाठी भूमीपूजन

पंतप्रधानांची केदारनाथला भेट विविध पायाभूत प्रकल्पांसाठी भूमीपूजन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केदारनाथला भेट दिली. केदारनाथ मंदिरात त्यांनी प्रार्थना केली. पाच पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांसाठी त्यांनी भूमीपूजनही केले. यामध्ये मंदाकिनी नदीवर संरक्षक भिंत आणि घाट यांचा विकास, सरस्वती नदीवर संरक्षक भिंत आणि घाट यांचा विकास, केदारनाथ मंदिराकडे जाणाऱ्या प्रवेशमार्गाची बांधणी, शंकराचार्य कुटीर आणि वस्तूसंग्रहालयाचा विकास आणि केदारनाथच्या पुरोहितांसाठी घरांचा विकास यांचा समावेश आहे. केदारपुरी पुनर्रचना प्रकल्पांबाबत पंतप्रधानांना यावेळी माहिती देण्यात आली.

यावेळी पंतप्रधानांनी जनतेला संबोधित केले. केदारनाथमध्ये आल्याचा आनंद होत असल्याचे ते म्हणाले. गुजरातमध्ये नववर्ष साजरे होत आहे. यानिमित्त जगभरातल्या गुजरातींना शुभेच्छा दिल्या असल्याचे ते म्हणाले.

“जनसेवा हीच ईश्वरसेवा” असल्याचा उल्लेख त्यांनी केला. वर्ष 2022 मध्ये आपण स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करणार आहोत. तोपर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकारण्यासाठी स्वत:ला वाहून घेत असल्याची प्रतिज्ञा पंतप्रधानांनी घेतली. 2013 च्या नैसर्गिक आपत्तीच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. गुजरातचे मुख्यमंत्री असताना आपत्तीचा फटका बसलेल्यांना सर्वतोपरी मदत केली होती, असे त्यांनी सांगितले.

केदारनाथमध्ये केल्या जाणाऱ्या कामातून तीर्थस्थळ, यात्रेकरुंसाठी सुविधा आणि पुरोहितांचे कल्याण अशा दोन्ही दृष्टीने आदर्श कसे असावे ते दिसून येईल, असे पंतप्रधानांनी सांगितले. केदारनाथमध्ये विकसित होत असलेल्या पायाभूत सुविधा उत्तम दर्जाच्या असतील. त्या आधुनिक असतील, त्याचबरोबर पारंपारिक मूल्ये जपणाऱ्या आणि पर्यावरणाला हानी न होणाऱ्या असतील, असे पंतप्रधानांनी सांगितले.

अध्यात्म, साहस आणि पर्यटन या दृष्टीने हिमालय भरभरुन दान देणारा आहे. हिमालयाला भेट देण्याचे आवाहन त्यांनी प्रत्येकाला केले.

यावेळी उत्तराखंडचे राज्यपाल डॉ. के.के.पॉल आणि मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत उपस्थित होते.

B.Gokhale/S.Kulkarni/ P.Malandkar