Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांचा वाराणसी दौरा

पंतप्रधानांचा वाराणसी दौरा

पंतप्रधानांचा वाराणसी दौरा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीला भेट दिली.

त्यांनी महामन पंडित मदन मोहन मालविय कर्करोग केंद्र आणि शताब्दी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची पायाभरणी केली.
वैद्यकीय विज्ञानात तंत्रज्ञानाची भूमिका सध्या वाढते आहे आणि केंद्र सरकार भारतात सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सुविधा प्रदान करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे, असे पंतप्रधानांनी यावेळी बोलतांना सांगितले.

भारतातील नागरिकांना, विशेषत: गरीबांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सुविधा प्रदान करणे ही आजच्या काळाची गरज आहे असे ते म्हणाले.

125 कोटी भारतीयांच्या क्षमतेवर आपला विश्वास असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. भारतातील नागरिक नि:स्वार्थ आहेत आणि अशा नागरिकांचा आशिर्वाद हा परमेश्वराच्या आशिर्वादासमान आहे, असे ते म्हणाले.

युवकांनी ऑनलाईन बँकींगकडे वळावे असे आवाहन त्यांनी केले.

भूमीगत केबल टाकण्याच्या कामाच्या आणि आयपीडीएस तसेच हृदय(HRIDAY) योजनेतर्गंत वारसा जतनाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी वाराणसीतील कबीर नगर भागाला भेट दिली. त्यांनी तेथील विद्यार्थ्यांशी संवाद सुध्दा साधला.

त्यानंतर पंतप्रधानांनी डीएलडब्ल्यू मैदानावर ईएसआयसी सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी पायाभरणी केली. नवीन व्यापार सुवधिा केंद्र आणि हस्तकला संग्रहालयाचेही उद्‌घाटन पंतप्रधानांनी केले.

N.Sapare/M.Pange/Anagha