Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांचा कटरा दौरा

पंतप्रधानांचा कटरा दौरा

पंतप्रधानांचा कटरा दौरा

पंतप्रधानांचा कटरा दौरा


श्री माता वैष्णोदेवी नारायण सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

श्री माता वैष्णोदेवी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधानांनी संबोधित केले

श्री माता वैष्णोदेवी क्रीडा मंडळाच्या परिसराचे उद्‌घाटन

सार्वजनिक सभेला उद्देशुन पंतप्रधानांचे भाषण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू-काश्मिरमधे कटरा भागाचा दौरा केला.

त्यांनी माता वैष्णोदेवी नारायण सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्‌घाटन केले आणि श्री माता वैष्णोदेवी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला संबोधित केले.

तीर्थ यात्रा करणाऱ्या गरीब भाविकांनी माता वैष्णोदेवीला अर्पण केलेल्या देणग्यांमधून या विद्यापीठाला मदत केली जाते, हे सर्व विद्यार्थ्यांनी कायम लक्षात ठेवावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. या गरीबांसाठी शक्य ते प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

देश सध्या यशाची नवी शिखरे गाठत आहे आणि लोकसंख्येपैकी युवा वर्गाच्या योगदानाने अनेक उद्दीष्टे गाठता येतील. एकविसावे शतक हे ज्ञानाचे शतक आहे आणि ज्ञानाच्या युगात भारताने नेहमीच मार्गदर्शन करण्याचे कार्य केले आहे, असे ते म्हणाले.

शैक्षणिकदृष्ट्या चांगले कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. ऑलम्पिक, जिमनॅस्टीक स्पर्धेसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला ठरल्याबद्दल दीपा करमरकरच्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले. या समारंभानंतर पंतप्रधानांनी श्री माता वैष्णोदेवी श्राईंग बोर्ड क्रीडा परिसराचे उद्‌घाटन केले आणि सार्वजनिक सभेला संबोधित केले. जम्मु आणि काश्मिरच्या मुख्यमंत्री सुश्री मेहबुबा मुफ्ती यांचे जोमदार नेतृत्व आणि उत्साहाचे, त्याचबरोबर जम्मु-काश्मिर राज्याच्या भविष्याच्या अनुषंगाने त्यांनी केलेल्या वक्तव्याचे पंतप्रधानांनी कौतुक केले. राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या स्मृतींनाही पंतप्रधानांनी उजाळा दिला.

समाजात खिलाडु वृत्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने खेळ महत्त्वाचे आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. 2017 साली खेळल्या जाणाऱ्या 17 वर्षांखालील वयोगटातील, फिफा विश्व चषक स्पर्धेचे यजमान पद भारताकडे असल्याचा त्यांनी उल्लेख केला. खेळांचा उत्सव साजरा करण्यासाठी ही उत्तम संधी असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

जम्मू-काश्मिरप्रती माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या ‘इन्सानियत, जम्हुरियत आणि कश्मिरीयत’ या दृष्टीकोनाचीही त्यांनी चर्चा केली. हा दृष्टीकोन लक्षात घेत राज्याचा विकास साधण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.

M.Pange / B. Gokhale