Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांचा आगामी श्रीलंका दौरा


पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 आणि 12 मे 2017 ला श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहेत.

फेसबुक अकाऊंट पोस्टमध्ये पंतप्रधानांनी सांगितले की,

“आज 11 मे पासून मी दोन दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. दोन वर्षांमधील हा माझा दुसरा द्विपक्षीय दौरा असेल जो आमच्या सखोल संबंधांचे द्योतक आहे.

माझ्या दौऱ्यादरम्यान मी 12 मे ला कोलंबो इथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय वेसक दिन समारोहात सहभागी होणार आहे, जिथे मी प्रमुख बुद्धिस्ट आध्यात्मिक नेते, तज्ञ आणि ईश्वर शास्त्रवेत्यां सोबत चर्चा करणार आहे. राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना आणि पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांच्यासोबत या समारोहात सहभागी होता येणार आहे ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे.
भारत आणि श्रीलंकेदरम्यान असलेला बुद्धिजमचा वारसा यामुळे देखील हा दौरा महत्त्वपूर्ण आहे.

2015 मधील माझ्या श्रीलंका दौऱ्यादरम्यान, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सहभागी असलेल्या आणि शतकांपासून बुद्धिजमचे महत्त्वपूर्ण केंद्र असलेल्या अनुरुद्धपूराला भेट द्यायची मला संधी मिळाली होती. यावेळी मला आदरणीय श्री दालादा मलिंगा यांना आदरांजली वाहण्याचे सौभाग्य प्राप्त होणार आहे. हे स्थळ सिक्रेट टूथ रेलिक मंदिर म्हणून देखील ज्ञात आहे.
कोलंबो येथील माझ्या दौऱ्याची सुरुवात गंगारमय्या मंदिर येथे सीमा मलाका यांच्या दर्शनाने होईल, जिथे मी पारंपरिक दिप प्रज्वलन समारंभात देखील सहभागी होणार आहे.

मी राष्ट्रपती सिरीसेना, पंतप्रधान विक्रमसिंघे आणि इतर मुख्य मान्यवरांची देखील भेट घेणार आहे.

भारताच्या सहकार्याने उभारलेल्या डिकोया रुग्णालयाचे देखील मी उद्‌घाटन करणार आहे आणि भारतीय मूळ असलेल्या तामिळ समुदायाशी देखील संवाद साधणार आहे.

मी या दौऱ्यातील ताज्या घडामोडी सोशल साईटवर टाकत राहीन. तुम्ही श्रीलंकेतील माझ्या सर्व कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण नरेंद्र मोदी मोबाईल ॲपवर पाहू शकता.

B.Gokhale/S.Mhatre/D.Rane