पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने, पंजाबच्या रावि नदीवरील शाहपूर कंडी धरण प्रकल्प कार्यान्वयनास मंजुरी दिली आहे. या सिंचन घटकांसाठी लागणारे केंद्रीय अर्थसहाय्य, 488.38 कोटी रुपये वर्ष 2018 -19 ते 2022-23 या पाच वर्षांच्या कालावधीत प्रदान केले जाईल.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे रावी नदीच्या पाण्याची होणारी नासाडी थांबण्यास मदत मिळणार आहे. सध्या हे पाणी माधोपुर हेडवर्क्सच्या वाहतूकमार्गे पाकिस्तानकडे जाते.
तपशीलः
• प्रकल्पाच्या पूर्णते नंतर पंजाबची 5000 हेक्टर सिंचन क्षमता आणि जम्मू-काश्मीरची 32,173 हेक्टर सिंचन क्षमता वाढणार आहे.
• शाहपुरकांडी धरण प्रकल्पांना केंद्रीय सहाय्यासाठी नाबार्डद्वारे निधी देण्यात येणार असून, हा निधी सध्या एलटीआयएफ अंतर्गत, 99 पीएमकेवाईवाय-एआयबीपी प्रकल्पांसाठीही देण्यात येतो.
• हा प्रकल्प पंजाब सरकारद्वारे कार्यान्वित होणार असून, केंद्राचे 485.38 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य या प्रकल्पाला मिळणार आहे. या प्रकल्पाचे काम जून 2022 पर्यंत पूर्ण होईल.
B.Gokhale/P.Kor