Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नैरोबी विद्यापीठातील विद्यार्थ्यांसमोरील पंतप्रधानांचे भाषण ( 11 जुलै, 2016)

नैरोबी विद्यापीठातील विद्यार्थ्यांसमोरील पंतप्रधानांचे भाषण ( 11 जुलै, 2016)


डॉ. विजू रत्तनसी,नैरोबी विद्यापीठाचे कुलपती

प्राध्यापक पीटर मबीथी,नैरोबी विद्यापीठाचे कुलगुरु

विद्यापीठ सिनेटचे सदस्य,

आदरणीय/प्रतिष्ठीत प्राध्यापक,

प्रिय विद्यार्थी,

जम्बो! हब्बारी गानी (नमस्कार, कसे आहात तुम्ही?)
या चेतनेने/ऊर्जेने भरलेल्या वातावरणात आल्यामुळे मी आनंदी आहे.

केनियातील सर्वोत्कृष्ट आणि हुशार लोकांमध्ये आल्यामुळे मला मनापासून आनंद होत आहे.

तुम्ही या भूमीची शान आहात तुम्ही आफ्रिकेच्या भविष्यकाळाचे प्रतिनिधित्व करता. तुमच्या आकांक्षा, महत्त्वाकांक्षा आणि कृती केवळ या महान देशाचे भाग्य आणि मार्ग यांना आकार देणार नाही. तर तुम्ही, या महान खंडाला भविष्यातील संपन्नतेच्या मार्गावरील वाटचालीलाही मार्गदर्शन करणार आहात. तुमच्यासाठी, केनियातल्या भावनाप्रधान भावी पिढीसाठी, मी भारतातल्या 800 दशलक्ष युवकांची ऊबदार मैत्री घेऊन आलोय.

ज्यात अर्थातच माझा समावेश आहे.

मित्रांनो, असे आहे की, जेंव्हा राष्ट्र उभारणीचा प्रश्न येतो किंवा केनियासारख्या मित्रांशी मैत्रीचे बंध जोपासायचे असतात, तेंव्हा माझ्ये हृदय हे एखाद्या वीस वर्षाच्या युवकाच्या भावनांशी जोडले जाते/तादात्म्य पावते.

प्रिय विद्यार्थ्यांनो,

नैरोबी विद्यालय ही एक दैदिप्यमान संस्था आहे. या संस्थेची ख्याती अतुलनीय आहे, केवळ आफ्रिकेतच नव्हे, तर सर्व जगभरात.

आणि, मी जेंव्हा तुमचे तरुण, उत्सुक आणि हुशार चेहरे पाहतो, तेंव्हा मला हे असे का आहे? हे कळते ! या शिक्षणाच्या बैठकीच्या द्वारामधून राजकीय नेते, अभियंते, शास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि कलाकारांच्या अनेक पिढ्या बाहेर पडल्या आहेत.

या विद्यापीठाने तुम्हाला प्रतिष्ठा/प्रसिद्धी, किर्ती प्राप्त करून दिली आहे. आणि हे विद्यापीठ केनियाच्या भावी पिढ्यांना घडवत आहे, आकार देतच आहे. हे विद्यापीठ दोन विकसनशील देश म्हणून भारत आणि केनियाच्या सामायिक इतिहासाचे आणि समान अनुभवांचे उदाहरण आहे.

आत्ताच, सभागृहात दाखल होण्यापूर्वी मी महात्मा गांधींना आदरांजली वाहिली, ज्यांच्या पुतळ्याचे बरोबर 60 वर्षांपूर्वी याच विद्यापीठात अनावरण झाले होते. महात्मा गांधी आणि या महान विद्यापीठातील हा दुवा म्हणजे, दोन महान देशांमधील भागीदारीच्या सुरुवातीच्या प्रारंभीच्या बंधांपैकी एक आहे.

आपल्या राष्ट्राच्या विकासासाठी मजबूत शैक्षणिक प्रणाली आवश्यक असण्याऱ्या दोन्ही समाजातील मूल्यांचा हा प्रतिध्वनी आहे.

आमच्याकडे एक प्राचीन भारतीय म्हण आहे:-

व्याये क्राते इवा नित्यं, विद्या धनं सर्व धन प्रधानम्!

याचा अर्थ असा- जे धन/संपत्ती दिल्याने वाढते ते धन म्हणजे ज्ञान आहे आणि ते सर्व मालकीच्या वस्तूंमध्ये सर्वोत्तम आहे. मला सांगण्यात आले की, तुमच्याकडेही एक स्वाहिली म्हण आहे. ‘पेसा, कामा मातुमिझी याके, हुईशा, कुर्जीफुंझा, कामा मातुमिझी याके, हुआनगेझेका’

म्हणजेच पैसा जर का तुम्ही वापरला तर तो संपतो, पण ज्ञान जर वापरले तर ते वाढते…

मित्रांनो,

केनिया हे प्राचीन खंडातील युवा राष्ट्र आहे. पण एक युवा राष्ट्र म्हणून तुम्ही अनेक क्षेत्रात उच्चतम गोष्टी साध्य केल्या आहेत.

केनियाच्या विख्यात पर्यावरण कार्यकर्त्या वंगारी माथाई, या नोबेल शांतता पुरस्कार पटकावणाऱ्या पहिल्या आफ्रिकी महिला ठरल्या. त्यांनी या विद्यापीठातूनच शिक्षण घेतले.

मूळ केनियन लुपिता नायोंगो हे ऑस्कर पुरस्कार मिळवणारे पहिले आफ्रिकन होते.
आणि जसे आपणा सर्वांना माहितच आहे, ते ओळखण्यासाठी कोणत्याही पुरस्काराची गरज नाही, की केनियाचे धावपटू हे जगभरातील मॅरेथॉन शर्यतीत आघाडीवर असतात, त्या शर्यतींवर वर्चस्व गाजवतात.

केनियातील हवामानाचे संवर्धन करणारे केवळ पाच मोठे (बिग फाईव्ह) नाहीत, परंतु ते सुयोग्य तंत्रज्ञान आदि शोधाच्या पुढाकारातून येणाऱ्या विकासासाठी योग्य जैव-प्रणाली पुरवतात.

केनिया हे पूर्व आफ्रिकी विभागातील महत्त्वपूर्ण आर्थिक आणि वाहतूक केंद्र आहे. केनियातच 2007 मध्ये एम-पेसाचा शोध लावण्यात आला. या कल्पनेने सर्व जग ढवळून निघाले. यामुळे जगभरात मोबाईल पेस सेवेचा प्रारंभ आणि विकास झाला.

फक्त केनियातच नाही, तर संपूर्ण जगभरात आणि एम-पेसाच्या द्वारे, जे आर्थिक प्रणालीच्या काठावर/सीमा रेषेवर होते. त्यांचे आता सक्षमीकरण होत आहे आणि ते मुख्य प्रवाहात येत आहेत. आता भारतातही त्याची आवृत्ती आहे.

प्रिय विद्यार्थ्यांनो,

आज भारत आणि केनिया दोन्हीही बहराला येत असलेल्या लोकशाही आहेत. आपण दोन विकसनशील राष्ट्रे आहोत, ज्यांना त्यांच्या जनतेसाठी शांतता आणि भरभराट हवी आहे. आपले संबंध खूप जुने आहेत.

अनेक शतकांपासून, व्यापार आणि संस्कृती, परंपरा, विचार आणि ध्येय, श्रद्धा आणि मूल्य या दुव्यांनी आपल्या समाजाला जोडले आहे.

आणि यामध्ये या हिंदी महासागरातील उबदार पाणी आपल्या जनतेला जोडणारा पूल बनले आहे.

मला असे माहित आहे की, केनियात 42 वंश आहेत आणि भारतीय वंशांच्या लोकांना 43 वा वंश म्हटले जाते.

तुमच्या समाजाच्या संपन्न वस्त्रोप्रमाणेच, भारतातही चैतन्यशाली वैविध्याचा उत्सव साजरा करण्याची प्राचीन परंपरा आहे.

खरोखरच, लोकशाही, स्वातंत्र्य आणि समानता हे आधुनिक भारताचे सार आहे.

मित्रांनो,

काल संध्याकाळी मी आणि राष्ट्राध्यक्ष केन्याटा यांनी भारतीय वंशांच्या लोकांसोबत एक अविस्मरणी अनुभव घेतला. अनेक दशकांपूर्वी, या लोकांनी केनिया आपले निवासस्थान बनवले. आणि आमच्या लोकांचे हे मिळून-मिसळून जाणे, एकरुप होणे हे आमच्यासाठी आधुनिक युगातील भागीदाराचे वचन प्रत्यक्षात उतरवण्यासाठीचा भक्कम पाया आहे.

मित्रांनो,

भारत आणि आफ्रिका एकत्रितरित्या 1/3 मानवजातीचे प्रतिनिधीत्व करतात. हे आपण विसरता कामा नये. इतर कोणीही विरोधात काहीही म्हणोत आणि असे अनेक जण असतील जे आपल्याला खाली खेचू इच्छित असतील, आम्ही या अंतर्गत जोडल्या गेलेल्या जगात नक्कीच अल्पसंख्य नाही आहोत.

आम्हाला दीर्घकाळ टिकणारी भागीदारी हवी आहे.

जी गुंतवणुकीचे जुने नियम आणि नमुन्यांवर अवलंबून नाही.

जी लोकांच्या सक्षमीकरणावर लक्ष केंद्रीत करते, त्यांना सक्षम बनवते.

तिथे आम्ही एकमेकांच्या आर्थिक संपन्नतेची फळे वाटून घेतो.

जी एकविसाव्या शतकातील संधीचा फायदा घेते.

आणि जी आपल्या समाजासाठी सुरक्षितता आणण्याचे आव्हान स्वीकारते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जी विभागातील तसेच जगभरातील विकसनशील देशांच्या विस्तृत सामायिक भल्यासाठी कार्य करते.

आणि केनियासोबतची आमची भागीदारी ही संपूर्ण आफ्रिकेसोबतच्या 21 व्या शतकातील गुंतवणुकीच्या दूरदृष्टीचा एकीकृत भाग आहे.

मित्रांनो,

उभरत्या आफ्रिकन अर्थव्यवस्थांमध्ये, केनिया हा सर्वात मजबूत खेळाडू आहे.

तुमची ही मजबूत/भक्कम परंपरांची भूमी आहे.

तुम्ही विपुल संधी असणारा देश आहात.

हिंदी महासागराच्या दुसऱ्या बाजूला 7.6 टक्के विकासदर असणारा भारत मोठी आर्थिक क्रांती अनुभवतो आहे.

आपल्यासमोरील आव्हानांची खोली आणि व्याप्ती पाहता, आपल्या दोघांसमोर उच्च आर्थिक विकास दर कायम राखण्यावाचून दुसरा पर्याय नाही.

यामुळे आपल्यासाठी एकत्रित काम करण्याच्या संधींचे नवे विश्व खुले होत आहे.

केवळ राजकीय परीघातच नव्हे तर आर्थिक सामाजिक आणि विकासाच्या क्षेत्रातही
आणि इतर अनेक पातळ्यांवर

आता आपण एकमेकांसोबत या आधी होत असलेल्या व्यापारापेक्षा अधिक व्यापार करत आहोत. केनियातल्या भारतीय कंपन्यांच्या लक्षणीय उपस्थितीमुळे आपल्यातील गुंतवणुकीची भागीदारी अधिक जोमदार, वैविध्यपूर्ण आणि चैतन्यदायी आहे.

यामुळे आपल्या दोन्ही समाजातील तरुण आणि शिक्षितांसाठी रोजगार निर्मिती होत आहे. आपल्यामधील माल आणि भांडवलांचा ओघ वाढेल तसे आपण वेगळ्या क्षेत्रात निर्मितीसाठी एकत्रित काम करण्याचे मार्ग शोधायला हवेत.

केवळ केनिया आणि भारतासाठीच नाही तर आफ्रिका आणि इतर विभागांसाठीही
या संदर्भात आरोग्य सुविधा हा विषय तात्काळ मनात येतो

या क्षेत्रातील भारताच्या अनुभवांचा फायदा केनियात प्रणाली, तसंच संस्था आणि क्षमता विकसित करण्यासाठी होऊ शकेल. आणि आमचे विशेष वैद्यकीय कौशल्य हे केनियाच्या युवकांसाठी महत्त्वपूर्ण आणि विशिष्ट हेतूचे ठरू शकते.

औषधोत्पादनासंबंधी आपल्या विकसित होणाऱ्या व्यापारा संबंधांना, उत्पादन दुव्यांची जोड देता येईल. केनियातल्‍या आरोग्य विषयक गरजांना ते प्रतिसाद देऊ शकतील.

तसंच आरोग्यविषयक मागण्या स्थानिक पातळीवर पुरवू शकतील/भागवू शकतील. केनियाचे भविष्य हे त्यांच्या युवकांच्या हातात आहे.

अशाच प्रकारे भारताचा नियतीच्या दिशेने होणारा प्रवास हा भारतातील 800 दशलक्ष युवकांच्या ध्येयामुळे होत आहे, हे जाणून घेण्यात तुम्हाला रस असेल.

आणि त्यांच्यासाठी आम्ही 2022 पर्यंत 500 दशलक्ष नवे रोजगार निर्मित करण्याची देशव्यापी मोहीम हाती घेतली आहे.

आणि, यापूर्वी कधीही न पाहिलेल्या प्रमाणात आमच्या युवकांना कुशल आणि विकसित करण्याशिवाय हे साध्य होणार नाही.

‘कुशल भारत’ आणि ‘स्टार्ट अप इंडिया’ यांचा उद्देश भारतातील रोजगार निर्मिती आणि वैयक्तिक उद्यमशीलता यांचा चेहरामोहरा बदलून टाकणे हा आहे.

आमच्या केनियात मित्रांच्या कल्याणासाठी, हितासाठी आमच्या क्षमता, अनुभव वाटून घ्यायला आम्हाला नक्कीच आनंद होईल.

संस्थात्मक आणि क्षमता निर्मिती क्षेत्रात या आधीच आपल्यात मजबूत भागीदार आहेत, विशेषत: शैक्षणिक क्षेत्रात…

परंतु हे पुरेसे नाही.

दळणवळण, कृषी, ऊर्जा आणि माहिती तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात वैविध्यता आणणे ही आजची गरज आहे. अशी क्षेत्रे जी केवळ आपल्या अर्थव्यवस्थांना आधुनिक बनवतील आणि चालना देणार नाहीत, तर आपल्या कुशल युवकांसाठी रोजगारही निर्मित करतील.

आपल्या सामायिक आव्हानांमुळे मोजमापाचा/मोजपट्टीचा प्रश्न नाही.

आणि आपण दोघांना मिळून/एकत्रितपणे परवडणाऱ्या किंमतीतील तंत्रज्ञानाच्या मार्ग शोधण्याची क्षमता आहे.

एम-पेसा ने दाखवून दिले आहे की, एखादी स्वदेशी संकल्पनेची तंत्रज्ञानाशी सांगड घालून आपल्या समाजातल्या वगळलेल्या घटकांचे आयुष्य वेगाने आणि परिणामकारक रित्या बदलू शकते.

जसजशा आपल्या अर्थव्यवस्था वाढीला लागतात आणि आपली भागीदारी बहरते, तेव्हा त्याचा पर्यावरणावर विपरित परिणाम होणार नाही हे निश्चित करण्याची जबाबदारी आपल्यावर येते.

खरोखरच आपल्या एकत्रिात मूल्यांपैकी एक मूल्य धरणी मातेप्रती आदर हे आहे.

आणि नोबेल पुरस्कार प्राप्त वंगारी माथाई यांनी हे अतिशय सुरेखरित्या मांडलेय-

त्या म्हणतात आणि मी उदघृत करतो ‘आपल्या पर्यावरणाचा विनाश न करणारा आपण विकास प्रवर्तित केला पाहिजे’

निसर्गाशी सुसंवाद साधत जगणे ही आपली समान परंपरा आहे आणि ‘हरित आफ्रिकेसाठी’ भागीदारी निर्मित करण्यासाठी हा योग्य मंच आहे.

अशी भागीदारी जी नवीन आर्थिक संधी निर्मित करेल. खरं तर आपल्या पर्यावरणाचे संरक्षण हे आंतरराष्ट्रीय ऊर्जा आघाडीसाठी भारताचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

ऊर्जेचा कायमस्वरुपी नवीकरणीय स्रोत म्हणून सौर शक्तीला लगाम घालणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे.

ही आघाडी, ज्यात 120 हून अधिक देशांची भागीदारी आहे, ती केनियासोबतच्या आपल्या संबंधांमधला एक उद्योन्मुख घटक आहे/अंग आहे.

या प्रमाणेच, सर्वंकष आयुष्यासाठी असणारी ‘योग’ ही प्राचीन भारतीय परंपराही निसर्गाशी तादात्म्य पावणारी आहे.

नैरोबी विद्यापीठाच्या प्रांगणात 7 हजार योगप्रेमींनी 19 जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला हे समजल्यानंतर मला खूप आनंद झाला आहे.

मित्रहो,

आपल्या आर्थिक लक्ष्याकडे अविचल वाटचाल हे खरोखरच प्राधान्य आहे.

पण आपल्या आपल्या लोकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करू शकत नाही.

आपली धार्मिक सुबत्ता आणि सामाजिक विकास खरोखरच खूप अधिक अर्थपूर्ण ठरतील, जर आपला समाज, आपले लोक सुरक्षित असतील.

राष्ट्राध्यक्ष उहरू यांनी गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये नवी दिल्लीत सांगितल्याप्रमाणे दहशतवाद हे असे कुकर्म आहे ज्याला सीमा माहित नाही, ज्याला कोणाताही धर्म नाही, कुठलाही वंश नाही आणि कुठलीही मूल्ये नाहीत

खरोखरच आपण अशा जगात राहात आहोत, तिथे द्वेष आणि हिंसाचाराची शिकवण देणारे आपल्या समानाचा पोत बिघडवत आहे.

केनियाची युवा प्रेरक नागरिक म्हणून आणि आफ्रिकी समाजाचे सदस्य म्हणून जे लोक मूलगामी विचारसरणींचा प्रसार करतात, त्यांच्याबाबत तुम्ही सावध राहण्याची गरज आहे.

तसेच जे दहशतवाद्यांना आसरा/थारा देतात आणि त्यांचा राजकीय साधने म्हणून वापर करतात त्यांचाही तेवढाच निषेध केला पाहिजे.

जहालमतवादी विचारसरणी विरोधात आघाडी निर्माण करण्यातही युवक महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.

विद्यार्थ्यांनो,

दोन सागरी व्यापारी देश आणि हिंदी महासागर किनारा संघटनेचे सदस्य म्हणून आपण समुद्रमार्गे होणाऱ्या धमक्यांबाबत दक्ष राहण्याची गरज आहे.

आणि आपला व्यापार आणि नाविकांच्या सुरक्षिततेला चाचेगिरी धोका ठरणार नाही, हे ही निश्चित केले पाहिजे आणि सर्वांना सागरी प्रवासाचे स्वातंत्र्य आहे, याकडेही लक्ष दिले पाहिजे.

केनियात येण्यापूर्वी मी मोझांबिक, दक्षिण आफ्रिका आणि टांझानियाला भेट दिली.

अनेक शतकांपासून आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्याचे भारताशी मजबूत सागरी संबंध आहेत.

आज ह्याच पूर्व किनाऱ्यासमोर व्यूहरचनात्मक आणि सुरक्षा विषयक आव्हाने उभी ठाकली आहेत.

त्यामुळे दोन्ही देशांदरम्यानच्या सागरी आणि किनारी सुरक्षा विषयक सर्व पैलू हे अधिक दृढ होण्याची गरज आहे.

प्रिय विद्यार्थ्यांनो,

हे परस्पर अवलंबित्वाचे युग आहे.

वाढत्या संधी आणि जटील आव्हानांच्या या जगात, तुम्हाला उद्याचा वारसा मिळणार आहे.

आणि या महान देशाच्या भविष्याला आकार देण्याचा

एक सुरक्षित आणि संपन्न केनिया आणि मजबूत आफ्रिका ही तुमची नियती आहे.
कोणालाही ती तुमच्यापासून हिरावू देऊ नका आणि तुम्ही तुमच्या महत्त्वाकांक्षांचा पाठपुरावा करतांना, हे नक्कीच लक्षात ठेवा की, राष्ट्रनिर्मिती हा निरंतर प्रवास आहे. ही निरंतर प्रक्रिया आहे.

त्यामुळे तुमच्या कृती इतरांसाठी मार्गदर्शक ठरोत

उच्च महत्वाकांक्षा ठेवा

मोठी स्वप्न पाहा आणि आणखी कार्य करा

‘युनिटाट एट ए बोट’ हे तुमचे बोधवाक्‍य सर्व काही विषद करते. एकत्रित/एकतेने कष्ट करा, कष्टाची फळे तुमचीच असतील.

आणि जेव्हा तुमच्या नियतीकडे मार्गक्रमण कराल, तेव्हा तुम्हाला समजेल की, भारत हा विश्वसनीय आणि भरवश्याचा भागीदार आहे.

एक भागीदार,

ज्याला तुमच्या यशामुळे आनंद होईल

जो नेहमी मदतीच्या हातासह समोर असेल

आणि तुमच्या गरजेच्या काळात नेहमी तुमच्यासोबत असेल.

तुमच्याशी बोलायला मिळणे हा सुसंधी आहे.

या संधीबद्दल नैरोबी विद्यापीठ, विद्याविभाग/प्राध्यापक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भविष्य असणारे तुम्ही विद्यार्थी यांचा आभारी आहे.

असंते सना, धन्यवाद!

खूप खूप धन्यवाद!

J.Patankar/B.Gokhale