Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ने पि ताव येथे म्यानमारच्या स्टेट काऊन्सलरसह माध्यमांना संयुक्तपणे संबोधित करताना पंतप्रधानांनी दिलेले निवेदन

ने पि ताव येथे म्यानमारच्या स्टेट काऊन्सलरसह माध्यमांना संयुक्तपणे संबोधित करताना पंतप्रधानांनी दिलेले निवेदन

ने पि ताव येथे म्यानमारच्या स्टेट काऊन्सलरसह माध्यमांना संयुक्तपणे संबोधित करताना पंतप्रधानांनी दिलेले निवेदन


महामहीम, स्टेट काऊन्सलर

मान्यवर प्रतिनिधी,

माध्यम जगतातील मित्रांनो,

मिंगलाबा

2014 मध्ये आशियाई शिखर परिषदेच्या निमित्ताने माझे इथे येणे झाले होते, परंतु सोनेरी भूमी असलेल्या म्यानमारचा हा माझा पहिला द्विपक्षीय दौरा आहे. मात्र ज्या आपुलकीने आमचे स्वागत झाले आहे, मला असे वाटते जणू काही मी माझ्याच  घरी आहे. यासाठी मी म्यानमार सरकारचे आभार मानतो.

महामहीम,

म्यानमार शांतता प्रक्रियेचे तुम्ही केलेले धाडसी नेतृत्व प्रशंसनीय आहे. ज्या आव्हानांचा तुम्ही सामना करत आहात, ते आम्ही जाणून आहोत. “राखीने”राज्यात अतिरेकी हिंसाचारामुळे विशेषतः सुरक्षा दल आणि निष्पाप  जीवांच्या हानीमुळे तुम्हाला झालेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मग ती मोठी शांतता प्रक्रिया असो किंवा एखादी  विशेष समस्या सोडवणे असो,आम्ही आशा बाळगतो की,सर्व संबंधित एकत्रितपणे असा तोडगा काढण्याच्या दिशेने काम करुशकतात ज्यामुळे म्यानमारची एकता आणि भौगोलिक अखंडता यांचा आदर राखून सर्वांना शांतता, न्याय आणि सन्मान मिळेल.

मित्रांनो,

मला वाटते की,भारताच्यालोकशाहीचा अनुभव म्यानमारसाठीदेखील प्रासंगिक आहे. आणि म्हणूनच म्यानमारच्या कार्यकारी, विधिमंडळ तसेच निवडणूक आयोग आणि प्रेस कौन्सिल सारख्या संस्थांच्या क्षमता निर्मितीतील आमच्या व्यापक सहभागाबद्दल आम्हाला अभिमान आहे. शेजारी या नात्याने, सुरक्षेच्या क्षेत्रात आपले हित एकसमान आहे. आपण आपल्या लांबच लांब भू आणि सागरी सीमेवर सुरक्षा आणि स्थैर्य कायम राखण्यासाठी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. रस्ते आणि पुलांचे बांधकाम, ऊर्जेची जोडणी आणि संपर्क वाढविण्याचे आपले प्रयत्न एका चांगल्या भविष्याच्या दिशेने संकेत देत आहेत. कलादान प्रकल्पामध्ये आम्ही सित्तवे बंदर आणि पालेटवा अंतर्गत जलमार्ग टर्मिनलचे काम पूर्ण केले आहे. आणि रस्ते बांधणीचे काम सुरु आहे. अप्पर म्यानमारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारतातून अतिवेगवान डिझेल ट्रकांची वाहतूक सुरु झाली आहे. 

आमच्या विकास भागीदारी अंतर्गत म्यानमारमध्ये उच्च दर्जाच्या आरोग्य, शिक्षण आणि संशोधन सुविधांचा विकास हीसमाधानाची बाब आहे. या संदर्भात, म्यानमार माहिती तंत्रज्ञान संस्था आणि प्रगत कृषी संशोधन आणि शिक्षण केंद्र विशेष उल्लेखनीय आहे. ही दोन्ही शिक्षणाची प्रमुख केंद्रे म्हणून वेगाने उदयाला येत आहेत. भविष्यात देखील आमचे प्रकल्प म्यानमारच्या गरजा आणि प्राधान्यक्रमानुसार असतील. आपल्या दोन्ही देशांदरम्यान आज झालेल्या सामंजस्य करारांमुळे आपल्या बहुआयामी द्विपक्षीय सहकार्याला अधिक बळ मिळेल.

मित्रांनो,

मला हीघोषणा करताना आनंद होत आहे कि आम्ही भारतात येण्यासाठी उत्सुक म्यानमारच्या सर्व नागरिकांना ग्रॅटिस व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे. मला हे सांगताना देखील आनंद होत आहे की,आम्ही भारतातील तुरुंगात असलेल्या म्यानमारच्या 40 नागरिकांना सोडून देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आशा करतो कि हे लवकरच म्यानमारमध्ये आपल्या कुटुंबियांना पुन्हा भेटू शकतील.

महामहीम,

ने पी ताव मध्ये माझा वेळ खूपच सार्थकी लागला. म्यानमारमधील आमच्या उर्वरित प्रवासाबाबतही माझ्या मनात उत्साह आहे. आज मी बागान मधील आनंद मंदिराला भेट देणार आहे. आनंद मंदिर आणि अन्य ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक इमारतींचे गेल्या वर्षी आलेल्या भूकंपात नुकसान झाल्यानंतर भारताच्या सहकार्याने पुनर्निर्माणाचे काम सुरु आहे. यांगॉन येथे भारतीय वंशाच्या समुदायाला भेटण्याव्यतिरिक्त मी धार्मिक आणि ऐतिहासिक महत्वाच्या स्मारकांनाही भेट देणार आहे. मला खात्री आहे कि आगामी काळात आपण परस्परांच्या लाभासाठी सशक्त आणि दृढ भागीदारी बनवण्यासाठी एकत्रितपणे काम करू.

धन्यवाद !

चेजू तिन बा दे !

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar