Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नेपाळमध्ये लुंबिनी येथे भारत आंतरराष्ट्रीय बौद्ध संस्कृती आणि वारसा केंद्राचा शिलान्यास

नेपाळमध्ये लुंबिनी येथे भारत आंतरराष्ट्रीय बौद्ध संस्कृती आणि वारसा केंद्राचा शिलान्यास


नवी दिल्ली, 16 मे 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान शेरबहादूर देऊबा यांनी आज नेपाळमधील लुंबिनी मठ येथे भारत आंतरराष्ट्रीय बौद्ध  संस्कृती आणि वारसा केंद्राच्या उभारणीचा शिलान्यास केला.

2.नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ (आयबीसी)  यांना लुंबिनी येथे लुंबिनी विकास ट्रस्टने (एलडीटी) दिलेल्या भूखंडावर आयबीसीतर्फे हे केंद्र उभारले जाईल. आयबीसी आणि  एलडीटी यांच्यात मार्च 2022 मध्ये भूखंडाबाबत करार झाला होता.

3. तीन प्रमुख बौद्ध परंपरा म्हणजे थेरावद, महायान आणि वज्रयान यांच्या भिख्खूंच्या हस्ते शिलान्यास कार्यक्रम झाल्यानंतर, उभय पंतप्रधानांनी केंद्राच्या प्रतिकृतीचे अनावरण केले.

4.एकदा हे केंद्र पूर्ण  झाल्यावर, जगभरातून बौद्ध धर्माच्या अध्यात्मिक पैलूंचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांचे स्वागत करणारे जागतिक दर्जाचे केंद्र असेल. ही आधुनिक इमारत असणार आहे आणि उर्जा, पाण्याचा वापर आणि कचरा हाताळणीच्या बाबतीत नेट झिरो निकषांनी युक्त असेल. या इमारतीत प्रार्थना सभागृह, उपासना केंद्र, ग्रंथालय, प्रदर्शन हॉल, कॅफेटेरिया, कार्यालये आणि इतर सुविधा असतील. 

N.Chitale/U.Kulkarni/ P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com