Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नेपाळचे उपपंतप्रधान गृहमंत्री बिमलेंद्र निधी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

नेपाळचे उपपंतप्रधान गृहमंत्री बिमलेंद्र निधी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट


नेपाळचे उपपंतप्रधान आणि गृहखात्याचा पदभार सांभाळणारे बिमलेंद्र निधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नेपाळच्या उपपंतप्रधान पदाचा आणि गृहमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी बिमलेंद्र निधी यांचे अभिनंदन केले. तसेच नेपाळमध्ये नव्याने सत्तारुढ झालेले पंतप्रधान पुष्पकमल डहाल ‘प्रचंड’ यांचेही अभिनंदन केले. नेपाळमध्ये सुरू असलेल्या विकासकार्याची माहिती बिमलेंद्र निधी यांनी यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दिली. भारत आणि नेपाळ यांच्या दरम्यान असलेले चांगले संबंध, फक्त दोन्ही सरकारमध्ये आहेत असे नाही तर उभय देशांतील नागरिकांमध्येही दृढ ऋणानुबंध निर्माण झालेले आहेत. नेपाळशी भारताचे परंपरागत मित्रत्वाचे संबंध आहेत आणि नेपाळच्या जनतेशीही भारताचे घट्ट नाते तयार झाले आहे, असे मनोगत पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केले.

नेपाळमध्ये आलेल्या प्रलंयकारी भूकंपानंतर तिथल्या जनतेला भारत सर्वतोपरी मदत करण्यास आजही सिध्द आहे. नेपाळी जनतेच्या पाठीशी भारत ठामपणे उभा आहे, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली.

नेपाळच्या पंतप्रधानांनी शक्य तितक्या लवकर भारताचा दौरा करावा, असे निमंत्रणही पंतप्रधान मोदी यांनी नेपाळचे उपपंतप्रधान निधी यांच्यामार्फत यावेळी दिले.

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor