Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नीती आयोगाने आयोजित केलेल्या ” चॅम्पियन ऑफ चेंज’ या कार्यक्रमात तरुण मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पंतप्रधानांचे संबोधन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ” चॅम्पियन ऑफ चेंज’ – जी २ बी भागीदारीद्वारे भारताचे परिवर्तन” या नीती आयोगाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात तरुण मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. हा कर्यक्रम प्रवासी भारतीय केंद्र येथे संपन्न झाला.

या मालिकेतील पंतप्रधानांचे हे दुसरे व्यख्यान आहे. गेल्या आठवड्यात पंतप्रधानांनी तरुण उद्योजकांना संबोधित केले होते.

सहा तरुण समूहाच्या सीईओनी , मेक इन इंडिया , शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा , उद्याची शहरे, परिवर्तनात्मक वित्तीय क्षेत्र आणि वर्ष २०२२ मधिल नवीन भारत या संकल्पनांवरील प्रात्यक्षिके पंतप्रधानांना दाखविली.

पंतप्रधानांनी या प्रात्यक्षिकांचे कौतुक करून त्यांनी सीईओजने भारताच्या भरीव प्रगतीसाठी दिलेल्या मूल्यवान वेळ आणि संकल्पनेसाठी आभार मानले. ते पुढे म्हणाले की, सरकारच्या निर्णय समितीने हे प्रात्यक्षिक लक्षपूर्वक ऐकले असून याचा त्यांना चालू समस्यांच्या निराकारणात ३६० डिग्री पातळीवर कार्य करतांना धोरण निर्मिती मध्ये उपयोग होईल.

पंतप्रधान म्हणाले की, लोकांचा सहभाग हा महत्वाचा प्रशासनातील घटक असून सरकारसह सीईओजची भागीदारी भारताच्या आणि पर्यायाने लोकांच्या कल्याणासाठी उपयोगात आणण्याचे उद्दिष्ट आहे.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची आठवण करताना पंतप्रधानांनी सांगितले की, महात्मा गांधींनी सर्व भारतीयांना आणि सैनिकांना त्यांच्या दैनंदिन कामांसह स्वातंत्र्यासाठी तयार केले. तथापि त्यांनी हि चळवळ व्यापक केली. पंतप्रधानांनी भारताच्या विकासासाठी सुद्धा आज हि चळवळ व्यापक होण्याच्या आवश्यकतेवर भर दिला . ते पुढे म्हणालेत की , वर्ष २०२२ पर्यंत आपण भारताच्या साचेबद्ध विकासासाठी आपले किती योगदान असावे या बाबत उद्दिष्ट ठरविले पाहिजे.

मोदी यांनी सीईओजना तुम्ही या कार्यात माझे भागीदार असून भारताला विकासाच्या दृष्टीने पुढे नेण्यात एकत्र काम करण्याच्या आवश्यकतेवर जोर दिला. कृषिक्षेत्रातील मूल्याधिष्ठितचे उदाहरण देताना पंतप्रधान म्हणाले की दुप्पट उत्पन्न मिळवण्यासाठी दीर्घकालीन दृष्टीकोनाची आवश्यकता आहे. अन्न प्रक्रियेवर जोर देतांना त्यांनी सांगितले कि कृषी क्षेत्रात अपुऱ्या पायाभूत सेवांमुळे कृषीमालाची नासाडी होऊन मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागतो.

पंतप्रधान म्हणालेत की, केंद्र सरकारने मुलभुत परिवर्तनासाठी अनेक निर्णय घेतले असून त्यांनी यूरिया उपलब्धता आणि उत्पादनासंदर्भात तसेच गॅस किंमत वाढ , अतिरिक्त उत्पदनावर मानधन इत्यादी निर्णयांची यादी अधिकाऱ्यांना दिली. यामुळे यूरियाचे अतिरिक्त उत्पदन २० लाख झाले ते पुढे म्हणाले कि नीम आवरण असलेल्या युरियाच्या उत्पादनाचा मोठ्या प्रमाणावरील दिशाबद्ल संपुष्टात आला.

त्यांनी कॅशलेस सोसायटीवर सरकारचा भर असल्याचे सांगितले व त्यांनी सीईओजला सरकारसह भागीदारीत या विषयावर समाज बांधणीसाठी सहयोगाबाबत विचारणा केली.

खादीला उत्सवांमधून भेट वस्तू द्वारे प्रोत्साहन देता येऊ शकेल ज्यामुळे गरीब लोकांना त्याचा फायदा होईल तसेच त्यांनी या साठी समाजात पोषक वातावरण निर्माण करायला हवे असे सांगितले

पीएम यांनी यावेळी सरकारच्या ई – मार्केटिंग बद्दल माहिती देतांना सांगितले कि या द्वारे छोटे उत्पादक सरकारला पुरवठा कसा यशस्वीपणे करतात हे कळले . त्यांनी १००० कोटी रुपयांची उलाढाल जीईएम द्वारे करण्यात आल्याचे आणि २८००० पुरवठादारांनी या मध्ये योगदान दिल्याचे सांगितले.

पंतप्रधान म्हणालेत कि लोकांना त्यांच्या देशाचा अभिमान असायला हवा .

भारतामध्ये प्रत्येकाने पर्यटनाला वैयक्तिकरित्या प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. टाकाऊकडून टिकाऊकडे { “waste to wealth”] या संकल्पनेचे उदाहरण देत त्यांनी सांगितले कि यामुळे स्वच्छ भारत आणि स्वच्छ पर्यावरणाचे उद्दिष्ट गाठण्याला प्रोत्साहन मिळेल. लोकांच्या छोट्या समस्या सोडविणे हे उद्योजक आणि व्यापाराचे उद्दिष्ट असायला हवे.

यावेळी अनेक केंद्रीय मंत्री आणि सरकारचे वरिष्ठ मंत्री उपस्थित होते.

*****

पीआईबी/ बी. गोखले