Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नीती आयोगाद्वारे आयोजित ” चॅम्पिअनस ऑफ चेंज” या विषयावर पंतप्रधानांनी तरुण उद्योजकांशी साधला संवाद


“चॅम्पियन ऑफ चेंज’ या विषयावर नीती आयोगाद्वारे प्रवासी भारतीय केंद्रात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी तरुण उद्योजकांशी संवाद साधून त्यांना संबोधित केले.

“सॉफ्ट पॉवर : इनक्रेडिबल इंडिया”, “शिक्षण आणि कौशल्य विकास” ,”आरोग्य आणि पोषाहार”,

” उद्याची” शाश्वत ऊर्जा”, डिजिटल भारत आणि २०२२ पर्यंतचा नवीन भारत या संकल्पनांवर सहा तरुण उद्योजकांच्या समूहाने पंतप्रधानांशी संवाद साधून त्यांना संबंधित प्रकल्प दाखविले.

तरुण उद्योजकांच्या विविध योजनांवरचे नाविन्यपूर्ण प्रात्यक्षिके बघून त्यांच्या प्रकल्पांचे कौतुक करतांना पंतप्रधान म्हणाले की, पूर्वी मोठ्या प्रमाणावरील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी समाजाकडून प्रयत्न केला जायचा आणि हे प्रयत्न समाजातील प्रमुख लोकांकडून व्हायचे.

पंतप्रधान म्हणालेत की, ” चॅम्पिअनस ऑफ चेंज” हा समाज आणि राष्ट्राच्या हितासाठी दिशाबद्दल झालेल्या शक्तींना एकत्र आणण्याचा एक प्रयत्न असून, हि प्राथमिकता संस्थात्मक सकारात्मक शक्यतांसाठी वापरण्यात येईल. ते पुढे म्हणाले की आज ज्या उद्योजक समूहांनी आपले प्रकल्प प्रत्यक्षीके दाखवली ते बहुदा केंद्र सरकारच्या प्रत्येक विभाग आणि संबंधित मंत्रालयाला साहायक ठरण्याची शक्यता आहे.

त्यांनी पद्म पुरस्काराचे उदाहरण देत सांगितले की प्रक्रिये मध्ये कसे परिवर्तन घडत जाऊन, आज समाजातील कार्यरत परंतु प्रसिद्धिपराङमुख लोकांची ओळख समाजाला झाली.

“केंद्र सरकार मधील वरिष्ठ अधिकाऱयांची चमू लोकांच्या हितार्थ कार्यरत असून नविनोत्तम सेवा देण्यास सक्षम आहे. जर तुम्ही निरंतर आणि अव्याहतपणे काम सुरु ठेवल्यास भविष्यात प्रशासनासाठी त्याचा दीर्घकाळ उपयोग होईल”, असे पंतप्रधानांनी तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देतांना सांगितले.

केंद्र सरकारने लोकांच्या हिताच्या दृष्टीने खूप छोटे छोटे बदल घडवून आणलेत ज्याचा फीडबॅक आम्हाला लोकांकडून मिळत आहे. सामान्य लोकांवरील विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही दस्तऐवजांवर स्वसाक्ष्यांकनाला संमती दिली तसेच सरकारी नोकरीमध्ये समूह ‘क’ आणि ड वर्गाच्या मुलाखतींना काढून टाकले. असे पंतप्रधानांनी सांगितले.

मोदी पुढे म्हणालेत की आज प्रत्येक गॅप कमी करण्यासाठी ‘ऐप’ आहे , तंत्रज्ञान आणि नूतन शोधामुळे प्रशासनात बदल घडून यायला मदत मिळेल. त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेला उजाळा देण्यासाठी विकेंद्रीकृत आराखडा महत्वाचा असून स्टार्ट- अप ची भुमिका परिवर्तनासाठी उपयोगी आहे असे सांगितले.

पंतप्रधानांनी समाजासाठी चांगल्या शिक्षकांच्या आवश्यकतेवर जोर दिला. त्यांनी तंत्रज्ञानामुळे शिक्षणाला मोठ्या प्रमाणावर बूस्ट मिळणार असल्याचे सांगितले.

पंतप्रधानांनी उद्योजकांना सरकारच्या विविध सामाजिक कल्याणकारी योजनांचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळण्यासाठी प्रोत्साहनात्मक कार्य करायला सांगितले.

त्यांनी करोडो सामान्य नागरिकांच्या सहभागानेच नवीन भारताची निर्मिती होऊ शकेल यावर जोर दिला. त्यांनी उद्योजकांना या प्रयत्नात त्यांचा सहभाग देण्यासाठी आमंत्रित केले.

यावेळी अनेक केंद्रीय मंत्री, नीती आयोगाचे उपाध्यक्ष श्री अरविंद पानागरिया आणि केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे समनव्यय नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी केले.

पी.आई.बी./ बी गोखले/ अनघा