Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

निती आयोगाच्या प्रशासकीय परिषदेची चौथी बैठक


नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली निती आयोगाच्या प्रशासकीय परिषदेची चौथी बैठक येत्या 17 जूनला, रविवारी होणार आहे. या एकदिवसीय बैठकीत केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल आणि केंद्रामधील वरिष्ठ अधिकारी सहभागी होतील.

राष्ट्रीय विकासाच्या दृष्टीने योजनांचा प्राधान्यक्रम ठरवणे, विविध क्षेत्रे आणि धोरण आखून राज्यांच्या मदतीने विकासाचा कार्यक्रम राबवणे याची जबाबदारी निती आयोगाच्या प्रशासकीय परिषदेकडे आहे. या बैठकीत गेल्यावर्षी राबवण्यात आलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला जाईल तसेच भविष्यातल्या योजनांचा प्राधान्यक्रम ठरवला जाईल.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवणे तसेच आयुष्मान भारत, राष्ट्रीय पोषण आहार अभियान, इंद्रधनुष, मागास जिल्ह्यांचा विकास कार्यक्रम आणि महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीच्या कार्यक्रमांची तयारी या सर्व विषयांवर या बैठकीत प्राधान्याने चर्चा होणे अपेक्षित आहे.

B.Gokhale/R.Aghor/P.Kor