पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजनारी शक्ती पुरस्कार विजेत्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवादसाधला.
पुरस्कार विजेत्यांच्या कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले.पुरस्कारविजेत्यांचे कार्य सर्वांना प्रेरणादायी आहे असे प्रशंसोद्गार काढून त्यांनी आपापल्या क्षेत्रात अधिक उत्तुंग कार्य करावे असे पंतप्रधान म्हणाले.
स्वच्छ भारतअभियानाला महिलांनी महत्व दिलेअसे सांगून हेअभियानयशस्वी ठरण्याचेमोठे श्रेय,त्यांनी या गोष्टीला दिले.प्रयागराज इथेनुकत्याच सांगता झालेल्या कुंभ मेळ्याचा उल्लेख करत, यावेळी या मेळ्यात उच्च दर्जाची स्वच्छता राखण्यात आल्याची चर्चा सगळीकडे होती असे त्यांनी सांगितले.स्वच्छता आता जन चळवळ ठरली आहे असे ते म्हणाले.
स्वच्छतेच्या या आंदोलनातले पुढचे पाऊल म्हणजे टाकाऊचेसंपत्तीतरुपांतर होय असे त्यांनी सांगितले.
कुपोषणावर मातकरणेआणि इंद्रधनुष अभियानामार्फतबालकांचे लसीकरण या मुद्द्यांनाही पंतप्रधानांनी स्पर्श केला.या दोनही बाबीत यशस्वी ठरण्यासाठीमहिलांची महत्वाची भूमिका आहे असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधी यावेळी उपस्थित होत्या.
*****
DJM/MC/NC
Had a wonderful interaction with recipients of the Nari Shakti Puraskar. https://t.co/3twrQqJFDg
— Narendra Modi (@narendramodi) March 9, 2019
via NaMo App