Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नागरी हवाई वाहतूक मंत्रालयांतर्गत मेट्रो रेल्वे सुरक्षा आयोगाचे कार्य करण्यासाठीं मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या एका मंडळ कार्यालय निर्मितीला मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील


नागरी हवाई वाहतूक मंत्रालयांतर्गत रेल्वे सुरक्षा आयोगात,मेट्रो रेल्वे (कार्य आणि देखभाल) कायदा 2002 अंतर्गत मेट्रो रेल्वे सुरक्षा आयोगाचे विहित कार्य करण्यासाठी, सहायक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या एका मंडळ कार्यालयाच्या निर्मितीला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

रेल्वेच्या विद्यमान दोन मंडळ आयुक्तांकडे दोन मंडळांचा अतिरिक्त कारभार सोपवायलाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. विद्यमान कार्यकक्षेत हे अधिकारी आपल्या अधिकारांचा उपयोग करतील.हे मंडळ सीएमआरएस नवी दिल्लीच्या कार्यकक्षेत येणार नाही.

मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त पद, नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाअंतर्गत, रेल्वे सुरक्षा आयोगात एचएजी ( वेतन स्तर 15 )मध्ये राहील.एका मंडळ कार्यालयासाठी वेतनापोटी वार्षिक अंदाजित खर्च 59,39,040 रुपये असेल. संस्थेच्या प्रारंभिक स्थापनेशिवाय मंडळ कार्यालयासाठी वार्षिक 7,50,000 रुपये खर्च अपेक्षित आहे.

या पदांमुळे सध्याच्या तसेच विभिन्न रेल्वे योजनांमध्ये प्रवासी सुरक्षा आणि मेट्रो रेल्वे परिचालन याविषयी मेट्रो रेल्वे (कार्य आणि देखभाल) कायदा 2002 मध्ये नमूद केल्याप्रमाणे लक्ष केंद्रित करता येणार आहे.

N.Sapre/N.Chitale/P.Kor