Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नागरी सेवा दिनानिमित्त पंतप्रधानांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधित केले

नागरी सेवा दिनानिमित्त पंतप्रधानांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधित केले

नागरी सेवा दिनानिमित्त पंतप्रधानांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधित केले

नागरी सेवा दिनानिमित्त पंतप्रधानांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधित केले


तप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरी सेवा दिनानिमित्त आज प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधित केले. हा प्रसंग प्रशंसेचा, मूल्यमापनाचा आणि आत्मपरीक्षणाचा आहे असे ते म्हणाले. पंतप्रधान पुरस्कार हे प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक पाऊल आहे असे सांगून त्यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. या पुरस्कारांवरून सरकारचे प्राधान्य दिसून येते असे ते म्हणाले.

पंतप्रधान पीक विमा योजना, दीनदयाळ उपाध्याय कौशल्य योजना, पंतप्रधान आवास योजना आणि डिजिटल भरणा सारखे प्राधान्य कार्यक्रम ज्यासाठी हे पुरस्कार देण्यात आले, हे नवीन भारतासाठी महत्वपूर्ण कार्यक्रम आहेत. पंतप्रधान पुरस्कार आणि महत्वाकांक्षी जिल्ह्यातील उपक्रमांवरील दोन पुस्तके आज प्रकाशित करण्यात आली, त्यांचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला.

महत्वाकांक्षी जिल्ह्यांबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की हे 115 जिल्हे त्यांच्या संपूर्ण राज्यांसाठी विकासाचे इंजिन बनू शकतात. त्यांनी विकासातील जन भागीदारी किंवा लोक सहभागाच्या महत्वावर भर दिला. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वप्नातील भारत साकार करण्यासाठी स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीचे 2022 हे वर्ष प्रेरणादायी ठरू शकेल असे ते म्हणाले.

अंतराळ तंत्रज्ञानासह सर्व प्रकारच्या उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर प्रशासन सुधारण्यासाठी करायला हवा असे पंतप्रधान म्हणाले. जगभरात उदयाला येणाऱ्या नवनव्या तंत्रज्ञानाबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ताळमेळ ठेवणे महत्वाचे आहे असे ते म्हणाले.

“महान क्षमता असेलेले लोक” असे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे वर्णन करून पंतप्रधान म्हणाले की देशाच्या कल्याणासाठी या क्षमता मोठ्या प्रमाणात योगदान देऊ शकतात.

***

(B.G okhale /S.Kane)