Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नवी दिल्ली येथे 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी एसओयुएल लीडरशिप कॉन्क्लेव्ह आयोजित केल्याबद्दल मी स्कूल ऑफ अल्टीमेट लीडरशिप संस्थेची प्रशंसा करतो, हा मंच जीवनाच्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना नेतृत्वाशी संबंधित पैलूंवर चर्चा करण्यासाठी एकत्र आणत आहे: पंतप्रधान


नवी दिल्ली 18 फेब्रुवारी 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 21 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे एसओयुएल (स्कूल ऑफ अल्टीमेट लीडरशिप) लीडरशिप कॉन्क्लेव्हला उपस्थित राहणार आहेत.ते म्हणाले की हा मंच जीवनाच्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना नेतृत्वाशी संबंधित पैलूंवर चर्चा करण्यासाठी एकत्र आणत आहे. या कार्यक्रमातील वक्ते त्यांचे प्रेरक जीवन प्रवास आणि महत्त्वाच्या विषयांसंदर्भातील दृष्टीकोन उपस्थितांशी सामायिक करतील, जे खासकरून तरुण प्रेक्षकांना आपलेसे वाटतील असे ते पुढे म्हणाले.

एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात;

“नवी दिल्ली येथे 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी एसओयुएल लीडरशिप कॉन्क्लेव्ह आयोजित केल्याबद्दल मी स्कूल ऑफ अल्टीमेट लीडरशिप संस्थेची प्रशंसा करतो. हा मंच जीवनाच्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना नेतृत्वाशी संबंधित पैलूंवर चर्चा करण्यासाठी एकत्र आणत आहे. या कार्यक्रमातील वक्ते त्यांचे प्रेरक जीवन प्रवास आणि महत्त्वाच्या विषयांसंदर्भातील दृष्टीकोन उपस्थितांशी सामायिक करतील, जे खासकरून तरुण प्रेक्षकांना आपलेसे वाटतील.

मी देखील 21 फेब्रुवारीला या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.
@LeadWithSoul”

S.Patil/S.Chitnis/P.Malandkar