महामहीम,
भूतानचे पंतप्रधान, माझे बंधू दाशो शेरिंग तोबगे जी, सोल बोर्डाचे अध्यक्ष सुधीर मेहता, उपाध्यक्ष हसमुख अढिया, उद्योग विश्वातील दिग्गज, जे आपल्या जीवनात, आपापल्या क्षेत्रात नेतृत्व देण्यात यशस्वी झाले आहेत, अशा अनेक मान्यवरांना मी येथे पाहात आहे आणि भविष्य ज्यांची प्रतीक्षा करत आहेत, अशा माझ्या युवा सहकाऱ्यांना देखील येथे पाहात आहे.
मित्रांनो,
काही आयोजने अशी असतात जी हृदयाच्या अतिशय जवळ असतात आणि आजचा हा कार्यक्रम देखील असाच आहे. राष्ट्रउभारणीसाठी, चांगल्या नागरिकांचा विकास गरजेचा आहे. व्यक्ती निर्मितीने राष्ट्र निर्मिती, जनापासून जगत, जनापासून जग, अशी कोणतीही उंची गाठायची असेल, विशालता मिळवायची असेल, तर आरंभ जनापासूनच सुरू होतो. प्रत्येक क्षेत्रात चांगल्या नेत्यांचा विकास अतिशय गरजेचा आहे आणि ही काळाची गरज आहे. आणि म्हणूनच The School of Ultimate Leadership ची स्थापना, विकसित भारताच्या विकास प्रवासात एक अतिशय महत्त्वाचे आणि खूप मोठे पाऊल आहे. या संस्थेच्या केवऴ नावातच ‘सोल’ आहे असे नाही. ही भारताच्या सामाजिक जीवनाचा soul बनणार आहे. आणि आपल्या लोकांना ज्याचा अगदी चांगल्या प्रकारे परिचय आहे, वारंवार ऐकू येत असते, आत्मा, जर या सोलला त्या भावनेने पाहिले तर आत्म्याची अनुभूती घडवते. मी या मिशनमध्ये सहभागी झालेल्या सर्व सहकाऱ्यांचे, या संस्थेशी संबंधित सर्व मान्यवरांचे अगदी मनापासून अभिनंदन करतो. लवकरच गिफ्ट सिटी जवळ The School of Ultimate Leadership चे एक विशाल संकुल देखील तयार होणार आहे. आणि आता जेव्हा मी तुमच्यामध्ये येत होतो त्यावेळी अध्यक्षांनी देखील मला त्याचे संपूर्ण मॉडेल दाखवले, प्लान दाखवला, खरोखरच मला वाटते की आर्किटेक्चरच्या दृष्टीने देखील हे नेतृत्व करेल.
मित्रांनो,
आज ज्यावेळी The School of Ultimate Leadership- सोल, आपल्या प्रवासातील पहिले पाऊल टाकत आहे, त्यावेळी तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहे की तुमची दिशा कोणती आहे, तुमचे लक्ष्य काय आहे? स्वामी विवेकानंद म्हणाले होते- “Give me a hundred energetic young men and women and I shall transform India.” स्वामी विवेकानंद जींना, भारताला गुलामीतून बाहेर काढून त्याचे रुपांतर करायचे होते. आणि त्यांना हा विश्वास होता की जर 100 लीडर्स त्यांच्याकडे असतील तर ते भारताला केवळ स्वतंत्रच नव्हे तर जगातील पहिल्या क्रमांकाचा देश बनवू शकतील. याच इच्छा-शक्तीने, हाच मंत्र घेऊन आपल्या सर्वांना विशेषतः तुम्हाला पुढे जायचे आहे. आज प्रत्येक भारतीय 21व्या शतकातील विकसित भारतासाठी दिवस-रात्र काम करत आहे. अशा वेळी 140 कोटींच्या देशात देखील प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक वर्टिकल मध्ये, जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये, आपल्याला उत्तमात उत्तम नेतृत्वाची गरज आहे. केवळ राजकीय नेतृत्व नव्हे, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात School of Ultimate Leadership कडे देखील 21व्या शतकातील नेतृत्व तयार करण्यासाठी खूप मोठा वाव आहे. मला खात्री आहे, School of Ultimate Leadership मधून असे नेते बाहेर पडतील, जे देशातच नव्हे तर जगातील संस्थांमध्ये, प्रत्येक क्षेत्रात आपला झेंडा फडकवतील. आणि असे देखील होऊ शकते की येथून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेला एखादा युवा, कदाचित राजकारणात नवा टप्पा गाठेल.
मित्रांनो,
कोणताही देश जेव्हा प्रगती करतो, तेव्हा नैसर्गिक साधनसंपत्तीची स्वतःची अशी एक भूमिका असतेच, मात्र त्यापेक्षाही जास्त मनुष्यबळाची खूप मोठी भूमिका आहे. मला आठवते की ज्यावेळी महाराष्ट्र आणि गुजरात वेगळे होण्याची चळवऴ सुरू होती, त्यावेळी तर आम्ही खूपच लहान बालके होतो. पण त्या काळात एक अशी देखील चर्चा होत असायची की गुजरात वेगळा होऊन काय करणार आहे? त्यांच्याकडे कोणतीही नैसर्गिक साधनसंपत्ती नाही, कोणतीही खाण नाही, ना कोळसा आहे, काहीच नाही आहे, हे काय करणार? पाणी देखील नाही, वाळवंट आहे आणि तिकडे पाकिस्तान आहे, हे करणार काय? आणि जास्तीत जास्त या गुजरातवाल्यांकडे मीठ आहे आणखी काही आहे का? पण नेतृत्वाचे सामर्थ्य पहा, आज तेच गुजरात सर्व काही आहे. तेथील सर्वसामान्यांमध्ये हे सामर्थ्य होते, रडत नाही बसले, की हे नाही आहे, ते नाही आहे, अमुक नाही, तमुक नाही, अरे जे आहे ते आहे. गुजरातमध्ये हिऱ्यांची एकही खाण नाही. पण जगात 10 पैकी 9 हिरे जे आहेत त्यांना कोणत्या ना कोणत्या गुजरात्याचा स्पर्श झालेला असतो. माझ्या सांगण्याचे तात्पर्य हे आहे की केवळ साधनसंपत्तीच नव्हे तर सर्वात मोठे सामर्थ्य असते- मनुष्यबळात, मानवी सामर्थ्यात, जनशक्तीमध्ये आणि ज्याला तुमच्या भाषेत नेतृत्व म्हटले जाते.
21व्या शतकात तर अशा साधनसंपत्तीची गरज आहे, जी नवोन्मेषाचे नेतृत्व करू शकेल, जी कौशल्याला योग्य दिशांनी वळवू शकेल. आज आपण पाहतो की प्रत्येक क्षेत्रात कौशल्याला किती महत्त्व आहे. म्हणूनच नेतृत्व विकासाचे जे क्षेत्र आहे, त्यात देखील नवी कौशल्ये पाहिजेत. आपल्याला खूपच शास्त्रीय पद्धतीने नेतृत्व विकासाचे हे काम अतिशय वेगाने पुढे न्यायचे आहे. या दिशेने सोलची, तुमच्या संस्थेची भूमिका खूप मोठी आहे. यासाठी तुम्ही काम देखील सुरू केले आहे, हे ऐकून मला अतिशय चांगले वाटले. विधिवत भलेही हा तुमचा पहिला कार्यक्रम दिसत असेल. मला असे सांगण्यात आले की राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी State Education Secretaries, State Project Directors आणि इतर अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी नेतृत्व विकासाकरिता चिंतन शिबिर आयोजित केले आहे. आणि मी तर असे म्हणेन की ही तर आता केवळ सुरूवात आहे. आता तर सोलला जगातील सर्वात चांगली नेतृत्व विकास संस्था बनताना पाहायचे आहे आणि यासाठी परिश्रम देखील करून दाखवायचे आहेत.
साथियों,
आज भारत एक ग्लोबल पावर हाऊस च्या रुपात उदयाला येत आहे. हे Momentum, हा Speed आणखी जास्त वेगवान व्हावा, प्रत्येक क्षेत्रात व्हावा यासाठी आपल्याला जागतिक दर्जाच्या नेत्यांची, आंतरराष्ट्रीय नेत्यांची गरज आहे. SOUL सारख्या Leadership Institutions, यामध्ये Game Changer सिद्ध होऊ शकतात. अशा International Institutions आपला Choice च नाही तर आपली Necessity आहेत. आज भारताला प्रत्येक क्षेत्रात Energetic Leaders ची देखील गरज आहे. जे जागतिक गुंतागुंतींवर (Global Complexities वर), जागतिक गरजांवर(Global Needs ) तोडगा(Solution) शोधू शकतील. जे समस्या सोडवताना, देशाच्या हिताला जागतिक मंचावर सर्वात पुढे ठेवतील. ज्यांचा दृष्टीकोन Global असेल, पण त्यांच्या विचारसरणीचा एक महत्त्वाचा भाग Local देखील असेल, आपल्याला असे Individuals तयार करायचे आहेत. जे Indian Mind सोबत, International Mind-set ला विचारात घेऊन पुढे जातील. जर Strategic Decision Making, Crisis Management आणि Futuristic Thinking साठी प्रत्येक क्षणाला तयार व्हायचे असेल. जर आपल्याला International Markets मध्ये, Global Institutions मध्ये Compete करायचे आहे तर आपल्याला असे Leaders हवेत ज्यांना International Business Dynamics जी जाण असेल. SOUL चे कामच हे आहे, तुमच्या कामाची व्याप्ती मोठी आहे, वाव मोठा आहे आणि तुमच्याकडून अपेक्षा देखील जास्त आहेत.
मित्रांनो,
तुम्हा सर्वांना एक गोष्ट नेहमीच- नेहमीच उपयुक्त ठरेल, आगामी काळात नेतृत्व केवळ अधिकारांपुरते मर्यादित राहणार नाही. नेतृत्वाच्या भूमिकेत केवळ तेच असतील ज्यांच्यात नवोन्मेषाची आणि प्रभाव टाकण्याची क्षमता असेल. देशातील प्रत्येक व्यक्तीला या गरजेच्या हिशोबाने उदयाला यावे लागेल. SOUL या Individuals मध्ये Critical Thinking, Risk Taking आणि Solution Driven Mindset develop करणारी Institution असेल. आगामी काळात या संस्थेतून असे नेते बाहेर पडतील जे Disruptive Changes दरम्यान काम करण्यासाठी तयार असतील.
मित्रांनो,
आपल्याला असे नेते बनवावे लागतील जे ट्रेंड बनवण्यासाठी नाही तर, ट्रेंड सेट करण्यासाठी काम करणारे असतील. आगामी काळात ज्यावेळी आपण Diplomacy पासून Tech Innovation पर्यंत एका नव्या नेतृत्वाला पुढे नेऊ तेव्हा या सर्व क्षेत्रात भारताचा प्रभाव आणि परिणाम, हो दोन्ही कैक पटींनी वाढतील.
म्हणजेच एका अर्थी भारताची संपूर्ण संकल्पना, संपूर्ण भविष्य एका सशक्त नेतृत्व असलेल्या पिढीवर अवलंबून असेल. यासाठी आपल्याला जागतिक पातळीवरील विचारपद्धती आणि स्थानिक संगोपनाच्या कार्यासह पुढे जायचे आहे. आपल्या प्रशासनाला, आपल्या धोरण निर्मितीला आपण जागतिक दर्जा द्यायला हवा.जेव्हा आपले धोरणकर्ते, सरकारी अधिकारी, उद्योजक आपल्या धोरणांना जगातील सर्वोत्तम पद्धतींचा स्वीकार करून त्यानुसार धोरणे आखतील तेव्हाच हे शक्य होईल. आणि या प्रक्रियेत सोल सारख्या संस्थांची भूमिका फार मोठी असेल.
मित्रांनो,
मी याआधीही सांगितले आहे की जर आपल्याला विकसित भारताची उभारणी करायची असेल तर आपल्याला प्रत्येक क्षेत्रात जलदगतीने वाटचाल करावी लागेल. आपल्या धर्मशास्त्रांमध्ये सांगितल्यानुसार-
यत् यत् आचरति श्रेष्ठः, तत् तत् एव इतरः जनः।।
म्हणजेच
महान व्यक्ती जसे आचरण करतात त्यांचे अनुकरण सामान्य लोक करत असतात. म्हणूनच आपल्याला अशा प्रकारच्या नेतृत्वाची गरज आहे जे प्रत्येक दृष्टीकोनातून तसेच असेल, जे भारताच्या राष्ट्रीय संकल्पनेचे प्रतिबिंब दाखवू शकेल आणि त्यानुसार कार्य करेल. भविष्यकालीन नेतृत्वात आपल्याला विकसित भारताच्या उभारणीसाठी आवश्यक पोलादी स्वभाव आणि जोश असे दोन्ही रुजवायचे आहे, सोल संस्थेचा हाच उद्देश असायला हवा. त्यानंतर आपोआप आवश्यक बदल आणि सुधारणा होत जातील.
मित्रांनो,
हा पोलादी स्वभाव आणि जोश आपल्याला सार्वजनिक धोरणे तसेच सामाजिक क्षेत्रांमध्ये देखील निर्माण करायचा आहे. आपल्याला गहन तंत्रज्ञान, अवकाश, जैवतंत्रज्ञान, नवीकरणीय उर्जा यांसारख्या अनेक उदयोन्मुख क्षेत्रांसाठी नेतृत्व घडवायचे आहे. क्रीडा, कृषी, उत्पादन आणि सामाजिक सेवा यासारख्या पारंपारिक क्षेत्रांसाठी देखील नेतृत्व घडवायचे आहे. सर्व क्षेत्रांमध्ये उत्कृष्टतेची केवळ आकांक्षा न बाळगता ती प्रत्याक्षात साध्य देखील केली पाहिजे. आणि म्हणून जागतिक स्तरावरील उत्कृष्टतेच्या नवनवीन संस्था विकसित करतील अशा नेत्यांची भारताला गरज भासेल. आपला इतिहास तर अशा संस्थांच्या गौरवशाली कथांनी भरुन वाहत आहे. आपण त्या भावनेला पुनरुज्जीवित करण्याची गरज आहे आणि हे काही फारसे कठीण नाही. जगात अशा अनेक देशांची उदाहरणे आहे ज्यांनी हे साध्य करून दाखवले आहे. मला वाटते की या सभागृहात बसलेले मित्र आणि बाहेरुन जे आपले बोलणे ऐकत आहेत ते लाखो मित्र, सगळेच हे करायला समर्थ आहेत. ही संस्था तुमच्या स्वप्नांची, तुमच्या दूरदृष्टीची प्रयोगशाळा बनली पाहिजे, जेणेकरून आजपासून 25-30 वर्षांनंतरच्या पिढ्या तुमची अभिमानाने आठवण काढतील. तुम्ही आज या संस्थेचा जो पाया घालता आहात त्याचे गुणगान करू शकतील.
मित्रांनो,
एक संस्था या रुपात तुमच्यासमोर कोट्यवधी भारतीयांच्या निर्धाराचे आणि स्वप्नांचे चित्र स्पष्ट असले पाहिजे. आपल्यासाठी आव्हानात्मक असलेली तसेच संधी सुद्धा असलेली क्षेत्रे आणि घटक देखील आपण स्पष्टपणे समजून घेतले पाहिजेत. आपण जेव्हा एकच लक्ष्य निश्चित करून आगेकूच करतो, एकत्रित प्रयत्न करतो तेव्हा त्यातून हाती येणारे परिणाम देखील अद्भुत असतात. सामायिक उद्देशामुळे निर्माण झालेली नाती रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक घट्ट असतात. अशी नाती मनांना एकत्र आणतात, उत्कटतेला खतपाणी घालतात आणि काळाच्या कसोटीवर देखील टिकून राहतात. जेव्हा सामायिक लक्ष्य महान असते, तुमचा उद्देश मोठा असतो तेव्हा नेतृत्व देखील विकसित होते संघभावना देखील विकसित होते आणि लोक स्वतःला स्वतःच्या लक्ष्यांप्रती समर्पित करतात. जेव्हा सर्वांचे एकच लक्ष्य असते, सामायिक उद्देश असतो तेव्हा प्रत्येक व्यक्तीमधील सर्वोत्तम क्षमता देखील प्रकट होते. एवढेच नव्हे तर अशा व्यक्ती मोठ्या संकल्पांनुसार स्वतःच्या क्षमता देखील वाढवतात. आणि याच प्रक्रियेत एक नेता विकसित होतो. स्वतःमध्ये जी क्षमता नाही ती मिळवण्याचा तो प्रयत्न करतो, जेणेकरुन आणखी वरच्या पातळीवर पोहोचता येईल.
मित्रांनो,
जेव्हा उद्देश सामायिक असतो तेव्हा संघभावनेची अभूतपूर्व प्रेरणा आपल्याला मार्गदर्शन करते. जेव्हा सर्वजण एका सामायिक उद्देशासह सह-प्रवासी म्हणून सोबत वाटचाल करतात तेव्हा त्यांच्यात एक नातेसंबंध विकसित होतो. ही संघ उभारणीची प्रक्रिया देखील नेतृत्व जन्माला घालते. सामायिक उद्देशाचे आपल्या स्वातंत्र्य संग्रामापेक्षा अधिक उत्तम उदाहरण दुसरे कोणते असू शकेल? आपल्या स्वातंत्र्य संग्रामातून केवळ राजकारणातच नव्हे तर इतर क्षेत्रात देखील नेते उदयाला आले. स्वातंत्र्य चळवळीच्या त्याच भावनेला आपल्याला पुनरुज्जीवित करायचे आहे. आणि त्यातून प्रेरणा घेऊन पुढे जायचे आहे.
मित्रांनो,
संस्कृत भाषेत एक उत्तम सुभाषित आहे:
अमन्त्रं अक्षरं नास्ति, नास्ति मूलं अनौषधम्। अयोग्यः पुरुषो नास्ति, योजकाः तत्र दुर्लभः।।
म्हणजेच असा कोणताही शब्द नाही जो मंत्रात परिवर्तीत होऊ शकत नाही, अशी कोणतीही वनस्पती नाही जी औषधाचे काम करू शकत नाही तसेच असा कोणताही मनुष्य नाही जो एकही काम करण्यास सक्षम नाही, केवळ हे करू शकणारा नियोजक मात्र दुर्मिळ असतो. सर्वांना अशा नियोजनकाराची गरज आहे जो त्यांचा योग्य ठिकाणी वापर करू शकेल, त्यांना योग्य मागर्दर्शन करू शकेल. सोल संस्थेची भूमिका देखील याच नियोजनकाराची आहे. तुम्हाला देखील साध्या शब्दांचे रुपांतर मंत्रामध्ये करायचे आहे, साध्या वनस्पतींचा औषधासारखा वापर करायचा आहे. येथे देखील अनेक क्षेत्रांतील नेते उपस्थित आहेत. तुम्ही नेतृत्वाबद्दलची अनेक कौशल्ये शिकून घेतली आहेत, त्यांना पैलू पाडले आहेत. मी कुठेतरी वाचले होते- जर तुम्ही स्वतःला विकसित केलेत तर तुम्ही वैयक्तिक यश अनुभवू शकता. तुम्ही जर संघ विकसित केलात तर तुमच्या संस्थेला वृद्धी अनुभवता येईल. मात्र जर तुम्ही नेते विकसित केलेत तर तुमच्या संघटनेची अभूतपूर्व वाढ होईल. या तीन वाक्यांतून आपल्याला नेहमी हे लक्षात राहील की आपल्याला काय साध्य करायचे आहेत, आपल्याला योगदान द्यायचे आहे.
मित्रांनो,
आज देशात एक नवी सामाजिक व्यवस्था निर्माण होत आहे जिची उभारणी 21 व्या शतकात आणि गेल्या दशकात जन्मलेली तरुण पिढी करत आहे. खऱ्या अर्थाने ही विकसित भारतातील पहिली पिढी असेल, जिला अमृत पिढी म्हणता येईल.सोल ही नवी संस्था अशा अमृत पिढीचे नेतृत्व उभारण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावेल असा विश्वास मला वाटतो. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो.
भूतानच्या राजांचा आज वाढदिवस असणे आणि आपल्याकडे हा कार्यक्रम होणे हा अत्यंत सुखद योगायोग आहे. आणि इतक्या महत्त्वाच्या दिवशी भूतानचे पंतप्रधान आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले आणि त्यांना येथे पाठवण्यात भूतानच्या राजांनी फार मोठी भूमिका निभावली त्याबद्दल मी त्यांचे अगदी मनापासून खूप खूप आभार मानतो.
मित्रांनो,
माझ्याकडे वेळ असता तर मी हे दोन्ही दिवस येथेच राहिलो असतो, कारण काही दिवसांपूर्वी विकसित भारत संबंधी एक कार्यक्रम झाला होता, तुमच्यापैकी अनेक युवक त्यात सहभागी होते. तर त्यावेळी मी बहुतेक दिवसभर त्या कार्यक्रमात उपस्थित राहिलो, तुम्हा सर्वांना भेटलो, गप्पा मारल्या. त्यावेळी मला अनेक गोष्टी शिकता आल्या, अनेक गोष्टींविषयी जाणून घेता आले. आणि आज तर माझे हे भाग्य आहे की पहिल्या रांगेत असे नेते बसलेले मला दिसत आहेत ज्यांनी जीवनात यशाच्या अनेकानेक पायऱ्या गाठल्या आहेत. या सर्वांना भेटण्याची, त्यांच्याशी बसून चर्चा करण्याची फार मोठी संधी तुम्हाला मिळालेली आहे. मला मात्र हे भाग्य लाभत नाही कारण जेव्हा जेव्हा हे नेते मला भेटतात तेव्हा ते काही ना काही काम घेऊन आलेले असतात. मात्र तुम्हाला त्यांच्या अनुभवांतून खूप काही शिकता येईल, समजून घेता येईल. हे सर्वजण आपापल्या क्षेत्रात फार प्रथितयश आहेत. आणि त्यांनी तुमच्यासाठी इतका वेळ दिला आहे, यामुळेच मनाला असे वाटते की, सोल नावाच्या या संस्थेचे भविष्य उज्ज्वल असलेले दिसते आहे. जेव्हा असे यशस्वी लोक एखादे बीज लावतात तेव्हा त्यातून निर्माण होणारा वटवृक्ष देखील यशाच्या नव्या पायऱ्या सर करणाऱ्या नेत्यांना जन्माला घालेल. या विश्वासासह, मी पुन्हा एकदा, या कार्यक्रमासाठी वेळ देणाऱ्या, ताकद देणाऱ्या आणि शक्ती देणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानतो. माझ्या देशातील तरुणांसाठी मी काही स्वप्ने पाहिली आहेत, माझ्या खूप अपेक्षा आहेत आणि मी प्रत्येक क्षणी माझ्या देशातील तरुणांसाठी काही ना काही करत राहतो. माझ्या मनात ही भावना सतत जागृत असते, मी त्यासाठी संधी शोधत असतो आणि आज पुन्हा एकदा अशी संधी मला मिळाली आहे. माझ्यातर्फे तरुणांना खूप खूप शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद।
***
A.Chavan/S.Patil/S.Chitnis/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
Addressing the SOUL Leadership Conclave in New Delhi. It is a wonderful forum to nurture future leaders. @LeadWithSoul
— Narendra Modi (@narendramodi) February 21, 2025
https://t.co/QI5RePeZnV
The School of Ultimate Leadership (SOUL) will shape leaders who excel nationally and globally. pic.twitter.com/x8RWGSZsFl
— PMO India (@PMOIndia) February 21, 2025
Today, India is emerging as a global powerhouse. pic.twitter.com/RQWJIW1pRz
— PMO India (@PMOIndia) February 21, 2025
Leaders must set trends. pic.twitter.com/6mWAwNAWKX
— PMO India (@PMOIndia) February 21, 2025
Instilling steel and spirit in every sector. pic.twitter.com/EkOVPGc9MI
— PMO India (@PMOIndia) February 21, 2025
I commend SOUL for their endeavours to nurture a spirit of leadership among youngsters. pic.twitter.com/otSrbQ2Pdp
— Narendra Modi (@narendramodi) February 21, 2025
We in India must train our coming generations to become global trendsetters. pic.twitter.com/5L4AFfY3wF
— Narendra Modi (@narendramodi) February 21, 2025
With determined endeavours and collective efforts, the results of our quest for development will surely be fruitful. pic.twitter.com/s1lmEIGUMq
— Narendra Modi (@narendramodi) February 21, 2025