Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नमो अॅपमध्ये असा एक विशिष्ट विभाग आहे जो जनतेला स्थानिक खासदारांशी संपर्क साधण्यात मदत करतो- पंतप्रधानांनी दिली माहिती


नवी दिल्‍ली, 16 ऑक्‍टोबर 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की, नमो अॅपमध्ये असलेला एक विशिष्ट विभाग  जनतेला स्थानिक खासदारांशी जोडून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो. ते म्हणाले की हा विभाग आपल्या लोकशाहीवादी प्रेरणेला आणखी चालना देण्यासाठी दीर्घकाळ मदत करेल. ते पुढे म्हणाले की हा विभाग लोकांना त्यांच्या भागातील स्थानिक खासदाराशी असलेला संपर्क अधिक दृढ करणे शक्य करून देतो, या खासदारांसोबत काही बाबी ठरवणे सुलभ होण्यासाठी उपयुक्त ठरतो आणि सरकारतर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांमध्ये भाग घेण्यात मदत देखील करतो.
एक्स मंचावर पंतप्रधान लिहितात:

“नमो अॅपमध्ये एक अत्यंत रोचक विभाग असा आहे जो येत्या काळात आपल्या लोकशाही प्रेरणेला अधिक मजबूत करण्यासाठी मदत करेल. हा विभाग तुमच्या भागातील स्थानिक खासदारांशी असलेला संपर्क अधिक सखोल करणे शक्य करून देईल, या खासदारांची भेट घेणे सुलभ करेल आणि सरकारने आयोजित केलेल्या विविध उपक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी देखील मदत करेल. आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम ते चैतन्याने भरलेल्या क्रीडा स्पर्धा, अशा प्रत्येक वेळी, खासदार आणि त्यांच्या मतदारसंघातील जनता यांना एकमेकांशी जोडले जाणे सोपे होईल nm-4.com/mymp”.

* * *

S.Kane/S.Chitnis/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai