नवी दिल्ली, 6 जानेवारी 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज धारचूला (भारत)- धारचूला (नेपाळ) येथे महाकाली नदीवर पूल बांधण्यासाठी भारत आणि नेपाळ यांच्यातील सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे.
या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्यामुळे उभय देशांमधील राजनैतिक संबंधांमध्ये अधिक सुधारणा होईल.
पार्श्वभूमी :
खुल्या सीमा आणि खोलवर रुजलेले उभय देशांमधील लोकांचे परस्परांशी नातेसंबंध आणि संस्कृती यामुळे जवळचा शेजारी म्हणून, भारत आणि नेपाळ यांच्यात मैत्री आणि सहकार्याचे अनोखे नाते आहे. भारत आणि नेपाळ हे दोन्ही देश सार्क, बिमस्टेक सारख्या वेगवेगळ्या प्रादेशिक मंचांवर आणि जागतिक मंचावर एकत्र काम करत आहेत.
S.Kane/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com