Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

द्वारका सेक्टर 21 ते ‘यशोभूमी द्वारका सेक्टर 25 ’ या विमानतळ मेट्रो एक्सप्रेस लाइन स्टेशनच्या विस्तारित मार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

द्वारका सेक्टर 21 ते ‘यशोभूमी द्वारका सेक्टर 25 ’ या विमानतळ मेट्रो एक्सप्रेस लाइन स्टेशनच्या विस्तारित मार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली विमानतळ मेट्रो एक्सप्रेस मार्गाचा  द्वारका सेक्टर 21 ते यशोभूमी द्वारका सेक्टर 25 येथील नवीन मेट्रो स्थानक  यशोभूमी द्वारका सेक्टर 25’ पर्यंतच्या  विस्तार मार्गाचे  उद्घाटन केले.  नवीन मेट्रो स्थानकात  तीन भुयारी मार्ग असतील – स्थानकाला  प्रदर्शन  हॉल, परिषद केंद्र आणि सेंट्रल एरिना यांना जोडणारा 735 मीटर लांबीचा एक भुयारी मार्ग; द्वारका एक्सप्रेसवे वरील प्रवेश/निर्गमन यांना जोडणारा दुसरा मार्ग ; तर मेट्रो स्थानकाला  यशोभूमीच्या भावी प्रदर्शन हॉलशी जोडणारा तिसरा मार्ग आहे.

दिल्ली मेट्रो विमानतळ एक्सप्रेस लाईनवरील मेट्रो गाड्यांच्या परिचालनाचा वेग ताशी 90 वरून ताशी 120 किमीपर्यंत वाढवेल, ज्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल.  नवी दिल्लीते यशोभूमी द्वारका सेक्टर 25′ या प्रवासाला सुमारे 21 मिनिटे लागतील.

धौला कुआ मेट्रो स्थानकावरून  मेट्रो मार्गे पंतप्रधानांचे यशोभूमी द्वारका सेक्टर 25 मेट्रो स्थानकावर  आगमन झाले.

पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले:

दिल्ली मेट्रोमध्ये सर्वांच्या चेहऱ्यावर स्मित  ! यशोभूमी परिषद केंद्राच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यासाठी द्वारका पर्यंतच्या  प्रवासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध क्षेत्रातील लोकांशी संवाद साधला.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

द्वारका पर्यंतचा आणि तिथून परतीचा एक संस्मरणीय मेट्रो प्रवास जीवनाच्या विविध क्षेत्रातील अद्भुत सह-प्रवाशांनी आणखी खास बनवला .”

***

N.Chitale/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai