पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने देशातील ग्रामीण भागत गृहनिर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या नवीन योजनेला मंजुरी दिली. या योजनेअंतर्गंत, सरकार व्याजावर अनुदान देणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (ग्रामीण) समाविष्ट नसणाऱ्या प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला व्याजावरील अनुदान उपलब्ध असेल.
या योजनेमुळे ग्रामीण भागातील लोकांना नवीन घरे बांधता येतील किंवा त्यांच्या सध्याच्या घरात सुधारणा करता येतील. या योजनेअंतर्गत कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्याला 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी व्याजावरील अनुदान मिळेल.
राष्ट्रीय गृहनिर्माण बँक या योजनेची अंमलबजावणी करेल. सरकार राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेला 3 टक्के व्याज अनुदान देईल जे पुढे प्राथमिक वित्तीय संस्थांना (अनुसूचित व्यावसायिक बँका, एनबीएफसी वगैरे) दिले जाईल. यामुळे लाभार्थ्याला भराव्या लागणाऱ्या समान मासिक हफ्त्यात घट होईल.
या नवीन योजनेमुळे ग्रामीण भागातील तयार घरांची संख्या वाढेल तसेच ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
B.Gokhale/S.Kane/Anagha