सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उद्या देशभरात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी होणार आहे.
नवी दिल्लीत सकाळी साडेसात वाजता संसद मार्गावरील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करतील. त्यानंतर राजपथ येथे ‘एकता दौड’साठी जमलेल्या नागरिकांना पंतप्रधान संबोधित करतील. तसेच तेथील जनसमुहाला एकतेची शपथ देतील.
सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त विजय चौकातून 8.15 वाजता सुरू होणाऱ्या एकता दौडला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील. या दौडसाठी ऐच्छिक सहभाग आहे. या दौडमध्ये शालेय विद्यार्थी तसेच क्रीडापटू मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय एकता दिवसाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतही आज केंद्र सरकारच्या विविध कार्यालयात एकतेची शपथ घेण्यात आली. राज्य तसेच इतर ठिकाणीही यानिमित्त कार्यक्रम होणार असून त्यातील काही कार्यक्रमांना केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत.
S.Tupe/N.Sapre
Tomorrow, on Rashtriya Ekta Diwas, India will run for unity! https://t.co/bVvF4qsuks
— Narendra Modi (@narendramodi) October 30, 2015